Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

संचार बंदीचे सर्वांनी पालन करावे-सपोनि महेश जानकर



खिर्डी प्रतिनिधी: ता.14/4/2020 ते 30/04/2020 रोजी पावेतो साजरे होणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमीत्ताने निंभोरा पो स्टे हद्दितील सर्व उत्सव समिती अध्यक्ष व भिमसैनिक यांची पो स्टे ला बैठक घेवुन सध्या कोरोना आजाराने संपुर्ण जगात थैमान घातले असुन त्याकरिता शासनाने संपुर्ण देशासह  महाराष्ट्रात संचारबंदी लागु केली असुन सदर संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे.

तसेच पुतळा बुद्धविहार इ. ठिकाणी आत मध्ये कोणासही प्रवेश न देता व गर्दी न करता 1/2 भन्तेजी किवा अध्यक्ष अशांनी जावुन  भिमवंदना करावी बाबत सुचित केले. तसेच कोरोना आजाराचे अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी सो, जळगाव यांनी जारी केलेल्या दंडप्र/01/ कवि/2020/55 दि.22/03/2020 अन्वये पारित आदेशाचे व पो स्टे कडील सिआरपीसी 149 प्रमाने बजाविण्यात आलेल्या नोटीसीचे तंतोतंत  पालन करने बाबत कळविले.  सदर बैठकीस 1. राजु भागवत सवर्णे,2. उमेश रमेश गाढे,3. महेंद्र कोचुरे,4. विवेक तायडे,4. चंद्रकांत गाढे यांचे सह निंभोरा पो स्टे हद्दितील सर्व समिती अध्यक्ष हजर होते. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून सपोनि. श्री महेश जानकर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीततेसाठी पोहेकाँ. राकेश वराडे, पोकॉ/ स्वप्निल पाटील, पोकॉ/ संदीप पाटिल यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध