Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

बोदवड शहरात मोकाट कूत्र्यांचा नऊ वर्षाच्या मूलीवर हल्ला...




बोदवड:प्रतिनिधी शहरातील जामठी रसत्याजवळ राहणार्या नऊ वर्षीय मुलीवर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला केला. यांत ईरम फातेमा इमरान मनियार ( वय ९) नामक मुलगी जखमी झाली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती.

परंतू, नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्यामूळे मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला आहे. यांत ; काही कुत्रे पिसाळलेले असल्याने अनेक कुत्र्यांना खरुज व खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे हे कुत्रे बेभान होत नागरीकांना त्यांचा त्रास होण्यास सुरुवात झाली असून प्रचंड प्रमाणात धोका निर्माण झालाय.

शहरातील जामठी रसत्याजवळ संबंधित मुलीचे घर असून ति घराबाहेर ऊभी होती. अचानक चार ते पाच कुत्र्यांनी मुलीवर हल्ला करुन मुलीला जखमी केले. मुलीच्या आरोळ्या एकू येताच वडील व शेजारील लोकांनी कुत्र्यांना हाकलले. यांत मुलीच्या पाठीवर व कानाजवळ मोठ्या प्रमाणात दूखापत झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी जखमी मुलीला जननायक फाऊंडेशनचे सदस्य असलेले जाफर मन्यार यांनी ग्रामीण रुग्णालयात नेत पूढे जिल्हा रुग्णालयात ऊपचारासाठी पाठवले.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे सर्वच बाजारपेठा बंद आहे. त्यामूळे मजूर वर्ग बेरोजगार झाला असून त्यांच्यावर ऊपासमारीची वेळ आली आहे. त्यामूळे येथे माणसांचेच खायचे वांदे झाल्याने मुक्या जनावरांचे काय? असा प्रश्न ऊद्भवलाय. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने मोकाट फिरणारे कुत्रे तसेच इतर जनावरांना खायला खाद्य भेटत नसल्यामूळे ते थेट माणसांवर हल्ला चढवल्याचा प्रकार आज बोदवड शहरात घडला. या पार्श्वभूमिवर ; नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून ९ वर्षीय मुलीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकारामूळे नागरिकांची अस्वस्थता वाढतेय. त्यामूळे मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध