Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ एप्रिल, २०२०
माणुसकीचा झरा... मध्य प्रदेश मधील कामगाराना यशोधन चैरिटेबल ट्रस्ट तर्फे अन्नदान
चोपडा,प्रतिनिधी देशात लॉकडाऊन मुळे विविध शहरात कामासाठी गेलेले मजूर उपासमारीमुळे आपल्या आपल्या गावी पायी निघाले आहेत असेच आज नाशिक येथून काही मजूर परिवार त्यांच्या लहान लहान मुलासह पायी जात असताना अजेंतेसीम येथील सरपंच कांतिलाल पाटील यांनी यावल रोडवरून पायी जातना बघितले त्यांनी विचारपुस केली असता जवळपास 6 ते 7 दिवस पासून नाशिक हुन पायी निघालेले होते
सकाळ पासून फक्त नाश्ता केला होता त्यांनी सामाजिक बांधिंलकी जपणारे यशोधन चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ राहूल पाटील यांना कळविले असता त्यांनी या लोकानां जेवणासाठी थांबवावे असे सांगितले आणि सर्व मजूर परिवाराना जेवण देऊन व लहान मुलाना बिस्किट देऊन मानवतेचे दर्शन देत मध्यप्रदेश मधील त्यांच्या मूळ गावाकडे पुढे रवाना झाले.
या प्रसंगी अजेंतेसीमचे सरपंच कांतिलाल पाटील,अजय राजपूत माजी शहर उपाध्यक्ष बीजेपी चोपड़ा, चंदू पाटील,प्रशांत सोनवणे सर,पंकज पाटील, दिनेश नाथबुवा यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा