Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

संचार बंदीत मॉर्निग वॉक महागात,शिरपुरात 24 लोकांवर गुन्हे दाखल



शिरपूर प्रतिनिधी- राज्य भारत संचार बंदी लागू असून सरकार व विविध यंत्रणा लोकांना संचार बंदीचे पालन करा या साठी वारंवार जनजागृती करत असून लोकांना आवाहन करण्यात येत आहे.

मात्र काही नागरिक विनाकारण घरा बाहेर पडून स्वतःचा जीव तर धोक्यात घालतच आहेत तर इतराना देखील धोका निर्माण करत आहेत. या मुळे पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे.मात्र तरी देखील जर नियम पाळत नसतील तर मग मात्र पोलीसांना कठोर कार्यवाही करावी लागत आहे.

काल शिरपूर शिरपूर पोलिसानी भल्या सकाळीच संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करत सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 24 जणांना पकडून गुन्हे दाखल केले आहेत. त्या मुळे लोकांना मॉर्निंग वॉक ला जाणे महागात पडले आहे. काल करवंद नाका व परिसरात संचार बंदीचे पालन न करणाऱ्यावर ही कारवाही करण्यात आली आहे. 

व ही कारवाही अशीच सूर राहणार असल्याचा इशारा पो.नी.हेमंत पाटील यांनी दिला आहे. यात शहरातील पकडलेल्या नागरिकांत  विजय मराठे,विजय वारुडे,अरुण पाटील,शशिकांत बडगुजर,मेहुल पटेल, किशोर माळी,सुनील सोनवणे, मयूर सोनवणे,विवेक सोनवणे,सागर वाघ, आकाश सोनगडे, परवेझ शहा, बाबा शेख,मुझहीद काझी, फईद मन्सुरी,मुस्तफा शहा, तौफिक बागवान,सर्वेश साहनी, राकेश चौधरी इ चा समावेश आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध