Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

महाराष्ट्रातील आजी-माजी ऊर्जामंत्रीचे दिवे लावण्यावरून आरोप –प्रत्यारोप


अमळनेर i प्रतिनिधी  – (पंकज पाटील )  देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांनी देशातील नागरिकांना आज रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी फक्त घरातील लाईट बंद करून दिवे लावण्यास  सांगीतले असतांना महाराष्ट्रातील आजी-माजी ऊर्जामंत्री आपआपले मत व्यक्त करत आहेत. त्यात तत्कालीन उर्जा मंत्री यांनी आपले मत व्यक्त करत असतानाचा व्हिडीओ प्रसारीत झाला आहे त्यात ते मत व्यक्त करत असतांना समोर ठेवलेला कागद वाचून मत व्यक्त करत आहेत .म्हणजेच त्यांचा अभ्यास उर्जा मंत्रालया बाबत किती आहे हे प्रत्यक्ष दिसून येते.


माजी ऊर्जामंत्री बावन कुळे यांनी मात्र उर्जा विभाग कसा काम करतो हे तोंडी पाट सांगितले आहे.त्याच बरोबर देश कोरोनाच्या लढाई लढत असतांना एकसंघ आहे हे सांगण्यासाठी हा एक प्रयत्न आहे व या निराशाजनक वातावरणात एक उर्जा निर्माण होईल एवढाच प्रयत्न आदरणीय पंतप्रधान यांनी केला आहे. यापूर्वी देखील देशाचे व महाराष्ट्राचे लाडके व चिरतरुण नेते आदरणीय शरदरावजी पवार यांनी पंतप्रधान यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला असून आजही ते पंतप्रधान यांच्या आव्हानाला  प्रतिसाद देतील असा विश्वास जनतेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध