Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

रावेर येथे लॉकडाऊन असताना बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल



रावेर-प्रतिनिधी येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात बेकायदेशीर देशी विदेशी दारू विकणाऱ्या तिघांवर रावेर पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या  दारू व मोटारसायकल हस्तगत केली आहे.

       
याबाबत रावेर पोस्टेशन कडून माहिती अशी की, शहरातील रूस्तम चौकात सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अब्दुल सत्तार शे. गुलाब वय ५७ वर्षे रा. गरीब नवाज मोहल्लातील मदरसा जवळ रावेर यांच्या मोटारसायकल क्रमांक MH 19 AG 9455 संशयित आरोपी शे. रफिक शे. कय्युम रा.गरीब नवाज मोहल्ला आणि रामचंद्र कडू तायडे रा. आसराबारी रावेर शहरातील रूस्तम चौकात देशीदारूचे दोन बॉक्स घेवून जात असतांना बेकायदेशीर दारू घेवून जात असल्याची माहिती रावेर पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत ९६ देशी दारूच्या बाटल्या ५ हजार रूपये किंमतीच्या आणि १५ हजार रूपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली. याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन आणि विना परवाना देशी विदेशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पो.कॉ. महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सतिष सानप हे करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध