Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

दि.०२/०४/२०२० पासून पुढील सुचना मिळे पर्यंत बाजार समिती आवारांतील दैनंदीन शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यापार व व्यवहार बंद



धुळे : प्रतिनिधी सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झाली आहे. सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आलेल्या असून. 

त्यादृष्टीने धुळे कृषि उत्पन्न बाजार समिती दि ०२/०४/२०२० पासून पुढील सुचना येई पर्यंत सर्व शेतकरी उत्पादक, अनुज्ञप्तीधारी आडत व्यापारी व इतर सर्व संबंधीतांना कळविण्यात येते की, बाजार आवारांतील दैनंदीन शेतीमालाची खरेदी-विक्रीचे व्यापार व व्यवहार करण्यास अडचण निर्माण झालेली असून बाजार समितीच्या आवारांत कामकाज करणारे संबंधित संघटनांनी बाजार समितीस लेखी कळविलेले आहे, 

तरी कोणीही धान्य भुसार, भु.शेंगा, कडधान्य व भाजीपाला हा शेतीमाल धुळे बाजार समितीत विक्रीस आणु नये, याची सबंधीतांनी नोद घ्यावी. 
असे आवाहन धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती
सुभाष शिवाजीराव देवरे 
यांनी केले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध