Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ एप्रिल, २०२०
चिखलीच्या जिनींग मालकाने परराज्यातील मजुरांना सांगितले घरी जायला
चिखली:प्रतिनिधी: बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली येथील तिरुपती जिनिंग च्या मालकाने आता कोरोना मुळे ३ महिने काम बंद असल्याचे कारण सांगत परराज्यातील मजुरांना घरी जायला सांगितलेय आणि काम नाही तर पगार हि मिळणार नाही असे सांगितल्याने जवळपास २५ ते ३० मजूर आपले साहित्य घेऊन मुलाबाळांसोबत घरी जायला पायी निघालेय.
या मजुरांचा मुकादम हि यापूर्वीच घरी गेल्याने त्यानेही पायीच निघायला सांगितलेय. कोरोना मुळे चिखली च्या एमआयडीसी मधील अनेक उद्योग बंद झाले आहेत. या ठिकाणी परराज्यातील आणि इतर जिल्ह्यातील मजूर काम करतात.
मात्र आता हे उद्योग बंद झाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तिरुपती जिनींग मालकाने आता पडत्या काळात मजुरांना सहकार्य करण्याचे सोडून त्यांना घरी जायला सांगितले आहे. तर शासनाने अशा मजुरांना आहे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याचे सांगितले असताना देखील या जिनिंग च्या मालकाने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे असे म्हणावे लागेल अशी माहिती दिनेश मजूर यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा