Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ एप्रिल, २०२०
जळगावात अजून एक रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह
जिल्हावासियांनो गांभीर्य लक्षात घेऊन लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करा
जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी दि.1 कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर फैलावत असून आज जळगाव जिल्ह्यातील अजून एक रूग्णाचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या दोन झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. याचाच भाग म्हणून देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव जिल्ह्यातील नागरिक लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे.
देशातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. ही बाब नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, येणारे दोन आठवडे अधिक काळजीचे असल्याने जळगाव जिल्हावासियांनी घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. जीवनावश्यक वस्तूचा कुठलाही तुटवडा भासणार नाही. त्यामुळे त्या घेण्यासाठी गर्दी करू नये.
प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनची साखळी अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा