Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

भोईसमाजाचे व्यवसाय बंद पडण्यामागची कारणे व त्यावर उपाय या वर केलेला विचार आपल्या समोर व खास करुण युवकांन करीता असलेली ती सुवर्ण संधी असे म्हणुयात



भोईसमाजाचे पारंपारीक व्यवसाय ज्या मसेमारी करणे, डांगरवाडी लावणे, चणे फुटाणे विक्री करणे, भेळ फरसान विक्री करणे नदि, नाल्या किनारी असल्या कारणाने थोड्याफार प्रमाणात शेती करणे असे, आता यात सगळेच व्यवासाय लोभ पावत चाललेत ‌त्यात प्रामुख्याने विचार केला तर त्याला कदाचित आपणच जबाबदार आहोत कारण काळानुसार सर्व काहि बदलत गेले त्यात आपणहि बदललो पण आपण आधुनिकरणाचा वापर करुण तो बदल आपल्या व्यवसायात केला नाहि असो अजुनहि वेळ गेलेली नाहि यासाठी आभार मानावे लागतील अशा समाजबांधवांचे ज्यांनी अजुनहि आपले काहि व्यवसाय जिवीत ठेवलेत ज्यात मुख्यत्वेकरुन मासेमारी, चणे-फुटाणे विक्री, भेळ-फरसान विक्री आता ह्या व्यवसायांन पैकी मासे मारी जो व्यावसाय आहे त्यात सर्वांत महत्वाची सहकार्याची गरज आहे ती मच्छिमार सोसायटी,संघ यांच्या सहकार्याची ज्यावर आजहि आपण म्हणजे भोई हा थाट मांडुन आहे त्यामुळे काहि बदल केल्यास ह्या व्यवसायात प्रगती करण्यास जास्त विलंब लागणार नाही असे वाटते ती कशी तर ह्या संघान किंवा सोसायटीन मार्फत बहुतांश धरणे हे भोईसमाजातील आर्थिक दृष्ट्या चांगल्या असणा-या समाज बांधवांना देऊन समाजातील असा स्तर आर्थिक दृष्ट्या प्रबळ करावा कारण ह्या गोष्टींसाठी आर्थिक दृष्ट्या प्रबळ असणारेच लोक लागतील असे वाटते तसेच आता या अशा समाजबांधवांची हि महत्वाची भुमिका हि कि भोईसमाजातील असे बांधव जे धरणे घेऊ शकत नाहि परंतु मासेमारी करतात तर ह्या सर्व धरणा वरील हि फक्त आणि फक्त भोईसमाजातील बांधवांन कडुनच मासेमारी करावी जेणे करुन दोन्हि स्तर आर्थिक दृष्ट्या प्रबल होण्यास हातभार लागेल असे मला वाटत.

वळुया इतर दोन व्यवसायान कडे एक चणे-फुटाणे, दुसरा भेळ-फरसान आज जर आपण जर मार्केट मध्ये गेलो तर स्विट्सचे दुकाने, मोठमोठे मॉल, डायफ्रुट शॉप याठिकाणी जर गेलात तर आपणाला कळेल कि आपल्या व्यवसायात आपण किती प्रगती करु शकतो व आर्थिक दृष्ट्या प्रगत होऊ शकतो ह्या दोन्ही व्यवसायात कच्च्या मालापासुन पक्का माल आपणच बनवतो त्यामुळे तिथे आपल्या पैश्यांची काहिप्रमाणात बचत होते  वर सांगितल्या प्रमाणे आपण जर आधुनिकतेची जोड आपल्या व्यवायाला दिली तर आपण खुप प्रगती करु शकतो या बाबत आकडे काय सांगतात ते बघु सर्व आकडे पक्क्यामालाचे आहेत 
शेगदाणे - ₹१०५ ते ₹११० किलो 
आणि हेच शेंगदाणे मॉल, स्विट्स,  ड्रायफ्रुट्स अशा दुकानावर ₹५०/- फक्त २०० ग्राम म्हणजे २५०/- किलो  चला आता हे बघु ₹१०५/- ते  ₹ ११०/- किलो वाले  शेंगदाणे ₹२५०/- किलो का व कसे विकले जातात तर त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण तयार केलेल्या मालाचे पॅकिंग काय असते पॅकिंग माल तोच जो आपण बनवतो फरक येवढाच कि तो सुंदर रित्या पॅक केलेला असतो त्या पॅकिंगवर ब्राण्ड टाकलेला असतो हा माल आपण जर ₹१२५/ किलो जरी अशा ठिकाणी विकला तर आपण आर्थिक दृष्ट्या भक्कम आपला हात कुणीच धरु शकणार नहि 
हाच आकडा भेळ व फरसाण च्या  बाबतीत फरसान आपण ८०-९० किलो विकतो थोडा आधुनिकीकरण चा वापर करुण हाच माल पॅकिंग करुण विकला तर ₹१२०- ₹१३० किलो जातो हा विचार करुण युवकांनी आपआपल्या व्यवसायाकडे वळुन आधुनिकीकरणाची जोड दिल्यास  आपणास आर्थिक दृष्ट्या प्रबळ हण्यास कोन्हीच रोखु शकत नाहि हे हि तेवढेच खरे आहे.

राहिला भोईसमाजाला पुन्हा व्यवसाय पुनर्जीवित करण्यासाठी शासनस्तरावर भोईसमाज प्रादेशिक आर्थिक मंडळाची स्थापना करुन फक्त भोईसमाजातील व्यवसाय करणा-यांना अर्थ सहाय्याची मागणी करणे तर त्याची दखल शासन घेईलच असे नाहि याचे मुख्य कारण आपली एकता जी आजपर्यंत शासनास दिसली नाहि त्याच राज्यस्तरीय एकत्रिकरणाच्या वाटचालिस भोईसमाज युवा मंचच्या सहाय्याने वाटचाल करीत आहोत गरज आहे आपल्या सारख्या अनेक समाजसेवक व सर्व संघटना पदाधिकारींची ज्यामुळे कदाचित लवकरच आमुलाग्र बदल समाजात घडेल अशा आशा आहे.

धन्यवाद ..!!!


आपला- 
श्री तुषार सोमनाथ साटोटे
नाशिक.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध