Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे करानो आता तरी सावधान व्हा धुळे शहरात करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू,मृतांची संख्या ३ वर
धुळे करानो आता तरी सावधान व्हा धुळे शहरात करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू,मृतांची संख्या ३ वर
हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या धुळ्यातील तिरंगा चौकातील कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे लोकमान्य हॉस्पिटल जवळील 80 फुटी रोड वरील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
धुळे प्रतिनिधी शहरात सोमवारी तिरंगा चौक परिसरात लोकप्रतिनिधीच्या भावाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना आज तिसर्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे धुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या तीनवर पोहचली आहे.
जळगाव, नंदुरबार पेक्षा धुळे जिल्ह्यात संसर्गजन्य करोना व्हायरसची लागण झालेले अधिक रुग्ण वाढल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
याअगोदर जिल्ह्यात साक्री तालुक्यातील पहिल्या करोनाबाधिताचा मृत्यू झाला होता तर एका बाधिताचा अहवाल येण्याआधीच धुळे शहरातील शासकीय महाविद्यालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर आज लोकप्रतिनीच्या भावाचा मृत्यू झाल आहे.
मालेगावला करोनाची लागण होण्यापूर्वी तेथे तीन वेळा तो गेला होता,अशी माहिती समोर येत आहे.
संपर्कातील लोकप्रतिनीधी सह शंभराहून अधिक जणांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा