Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

वैद्यकीय नियमांचे पालन करुन समाज बंधुभगिनी मदतीसाठी पुढे..



पैठण प्रतिनिधी: कोरोनाच्या लागणमुळे अनेकांचे जीवन काही अकड्यावरुन संपल्याचे दिसत आहे. देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनानुसार जनता ही आपल्या घरात बसुन कोरोनाचा सामना करत आहे; 

परंतु हातावर पोट असलेल्यांना काही ठिकाणी समाजभावनेतून मदत करण्यासाठी सामाजिक सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना वैद्यकीय नियमांचे पालन करुन पुढे जाऊन मदत करतांना दिसत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील वाड्याच्या परिवारा मधील 150 कुटुंबातील गरजू गोरगरीबांना भोई कहार समाजाचे विद्यमान नगरसेवक, पैठण नगरपरिषदेचे शिक्षण समितीचे सभापती मा श्री बजरंगभाऊ लिंबोरे यांनी स्वखर्चाने गहू, साखर, तांदूळ चहापूडा व इतर जीवनावश्यक वस्तूं ज्या काही दिवस गरजूंना पुरतील त्याचे वाटप केले. वाटप करताना नगरसेवक मा श्री बजरंगभाऊ लिंबोरे यांच्या सोबत नगरसेवक जीतु परदेशी, कैलास बनगैय्या, अनिल लिंबोरे आदि समाजबांधव होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध