Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

लाॅकडाऊन मुळे कष्टकरी जनतेचे बेहाल महाराष्ट्र सरकार लक्ष देणार का? - भोई समाज सेना



धुळे:प्रतिनिधी जगात कोरोना मुळे हाहाकार निर्माण झाल्याने भारतात तो वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 15 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन घोषित केला. केंद्र सरकार व राज्य  सरकार महाराष्ट्रात कोरोना वाढू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यात काही प्रमाणात यशही येत आहे. 

सामान्य  जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र व राज्य सरकार मिळून योग्य ती पावलेही उचलत आहेत. जनधन खात्यात 500 रुपये पर्यंतची रक्कमही जमा झाली आहे, रेशन ला मोफत धान्य वाटपही सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
परंतु या सर्व योजनांचा लाभ  सर्वच सामान्य, कष्टकरी, रोजंदारी  करणारे, बांधकाम मजूर, कलर काम, मासेमारी, हमाली, सलून, वेटर इ.अनेक प्रकारची कामे करणार्यांना होत आहे असे दिसत नाही. 

कारण यात असे अनेक जण आहेत त्यांची सरकार दरबारी नोंदच नाही, काहींचे रेशन कार्ड बनलेले नाहीत, हातांना काम नसल्याने हाताशी असलेला उधारीने घेऊन ठेवलेला पैसा ही या 15 दिवसांत संपला आहे. आता जगायचं कसं असा प्रश्न या कष्टकरी जनते समोर उभा आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकार ने या सर्व गरीब कष्टकरी जनतेसाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचं आहे. 

लाॅकडाऊन मुळे कोरोना आटोक्यात येईल,  पण उपासमारी मुळे मरण पत्करण्याची वेळ या गरीब जनते वर येऊ नये याची दक्षता सरकारने घेणे गरजेचे आहे. म्हणून तात्काळ अश्या गरीब कष्टकरी जनतेला उपासमारी तुन मुक्त करण्यासाठी सरकारने स्थानिक जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावेत, अशी विनंती भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश तर्फे संस्थापक अध्यक्ष भिलेश खेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  रोहित शिंगाणे, प्रदेश उपाध्यक्ष पूनमचद मोरे, प्रदेश कायदेशीर सल्लागार अॅड योगेश मोरे, तसेच विविध जिल्हा अध्यक्ष - नागेश बट्टेवाड,आशुतोष वाडीले, अमोल भोई, गणपत पांडलवार, बालाजी नागलवाड, रोहिदास ढोले, ज्ञानेश्वर जाधव, दीपक वाडीले, खुशाल वाडेकर, कांतीलाल मोरे, राहुल वाडीले आदींनी कष्टकरी गरीब जनते तर्फे महाराष्ट्र सरकार विनंती केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध