Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

सावदा येथे सलग दुसऱ्या दिवशी रेशन दुकानावर कार्यवाही



खिर्डी प्रतिनिधी - सावदा येथे दी 7 रोजी येथून जवळ असलेल्या वाघोदा खु, व सावदा येथील एक अश्या दोन रेशन दूकानदारांवर महसूल विभागा तर्फे कार्यवाही करण्यात येऊन त्यांचे विरुद्ध सावदा पो,स्टे, ला गुन्हे दाखल करण्यात आले होते, 
       
याच दरम्यान ही कार्यवाहि पुढे चालू ठेवत आज सावदा येथील इतर दुकानाची तपासणी करण्यात येऊन यात दुकान न 12 याचे दफ्तर तपासणी करण्यात आली यात अनियमितता आढळून आल्याने  त्या दुकानादार  बाबत तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी आदेश दिल्यावरुन तालुका पुरवठा निरिक्षक हर्षल पाटील यांनी सावदा पो, स्टे, ला, जाऊन फिर्याद दिल्याने दुकानदार भूषण सुरवाडकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान तालुक्यात इतर ठिकाणी देखील अश्याच प्रकारे कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सोबत महसूल विभागातील वेळोवेळी काही जण देखील ठराविक रेशनदुकांनदाराना पाठबळ पुरवित असल्याने ते मुजोर होतात मात्र यात सर्रास सर्व रेशनदुकानदाराना जे सचोटी ने काम करतात त्यांना गोविने एकाची शिक्षा दुसऱ्यास देण्यासारखा प्रकार असून त्यामुळे अश्या कर्मचा-यांना देखिक चाप बसावा अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे
        
दरम्यान वाघोदा खु येथील 1 व सावदा येथील 2 दुकाना विरुद्ध कार्यवाही करण्यात आल्याने आता एन कोरोना सारखे संकटात त्या दुकाना कड़े असलेला नागरिकांचा रेशन पुरवठा हा महसूल विभागा तर्फे सुरळीत रहाव याची देखील काळजी घ्यावी असे देखील अपेक्षा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध