Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

शासनाने पिडीत गावात मदतीचा हात द्यावा... सौ रंजनाताई मनोहर पारशिवे



वरोरा-चंद्रपुर प्रतिनिधी:वरोरा तालुक्यातील वडगाव या गावात गेल्या दोन दिवसापासून काही समाजघटक उपाशी असल्याचे कळताच विरांगणा राणी झलकारीबाई बदऊदेशीय संस्थेमार्फत अन्नधान्य तसे किराणामाल परिसरातील 8 ते ९ परिवाराला वाटप करण्यात आला त्यात काही विधवा महिला, 

त्यांचे लहानलहान लेकरे ही होती. गावातील  द्रुश्य पाहुन खरच डोळ्यातुन पाणी आले एकीकडे सरकार म्हणते आम्ही धान्य वाटप करतो आहे ते खरच करत ही असेल, जनधन योजनेच्या खात्यात ५०० रु देत आहोत तेही देत असतील, उज्वला गॅस योजनेतून शिलेन्डर घेतलेल्या ग्राहकांना शिलेन्डर फ्री देत आहोत तर तेही देत असतील पण काही ठिकाणी याचा लाभ होतांना दिसत नाही तर तो केव्हा मिळेल? असा प्रश्न संबंधीत परिसरातून विचारला जात आहे आणि तशी अवस्थाही माझ्या पाहणीनुसार दिसत आहे. 

परिसरात काही ठिकाणी हातावर आनुन पानावर खानाऱ्या लोकानवर उपासमार पडायची वेळ आली आहे. मायबाप सरकारला आपल्याला माझी विनंती आहे की, द्यायच आहे ते लवकरात लवकर द्या. या गरीब जनतेला राषन दुकानदार काय म्हणत आहेत यांची ऑडीओ क्लीप ही माझ्याकडे आहे. 

तरी परिसरातील गरीब जनतेपर्यंत मदत ही मिळेल अशी मागणी सदर माध्यमातून करत आहे. 

सौ रंजनाताई मनोहर पारशिवे
८६९८९७७८७६
अध्यक्षा: अखिल भारतीय विमुक्त भटक्या जातीजमाती महाराष्ट्र प्रदेश. 
अध्यक्ष: विदर्भ भोई समाज सेवा संघ 
अध्यक्षा:विरांगना राणी झलकारीबाई बहुऊदेशीय संस्था.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध