Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ एप्रिल, २०२०
फैजपूरात निलेश राणे यांच्या तर्फे २००० मास्क वाटप
फैजपूर प्रतिनिधी सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणावर मास्क आणि सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत. वापर वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा होऊन मास्कचे भाव आता गगनाला भिडले आहेत.
साधारण दहा ते वीस रुपयाला मिळणारे मास्क आता ३० ते ४० रुपये ला मिळू लागले आहेत. आणि ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला मास्क वापरने खर्चिक वाटत होती.
सर्वसामान्यांची हीच अडचण लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी स्वखर्चाने शहरातील २००० नागरिकांना मास्क उपलब्द करून दिले. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व निलेश राणे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आहे. व कोरोना विषाणूंची लागण बाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व घरातच राहावे असे आव्हान करण्यात आले.
यावेळी गोटू भारंबे, वैभव वकारे, पवन सराफ, हिमांशु राणे, विशाल चौधरी, भैया पाटिल, पिंटू भाऊ मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा