Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ एप्रिल, २०२०
मरकजमधील लोकांना गोळ्या घालून ठार करा, राज ठाकरे भडकले
मुंबई, प्रतिनिधी 4 एप्रिल : दिल्लीतील निजामुद्दीन इथं झालेल्या तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच भडकले आहेत. 'मरकजच्या घटनेतील लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे,' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
'महाराष्ट्रातही मरकजसारखा कार्यक्रमक होणार होता. वसईत मरकज होवू दिले नाही त्या बद्दल महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले पाहिजे. दिल्ली पोलिसांकडून मात्र असं झालं नाही. हा काही ब्लेम गेम नाही, पण सध्याच्या स्थिती ते होणं गरजेचं होतं. लॉकडाऊन थोडे दिवसांसाठी आहे नंतर आम्ही आहोतच,' असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारसह नियम मोडणाऱ्या नागरिकांवर परखड भाष्य केलं आहे. जनतेला नम्र विनंती आहे लॉकडाउनला गांभीर्याने घ्या. जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत. लॉकडाऊन वाढवला गेला तर त्याचा परिणाम उद्योग धंद्यांना होईल,' अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलेल्या भाषणावरही नाराजी व्यक्त केली आहे. 'लोक घरातच आहेत तर दिवे पेटवतील. मात्र पंतप्रधानांच्या भाषणातून आशेचा किरण दिसायला पाहिजे होता. देशातील रुग्णांची स्थिती काय आहे, बाकी त्यांच्यावरील उपचारांची स्थिती काय आहे, गरिबांच्या अवस्था बिकट झाली आहे, याबाबत त्यांनी भाष्य करणं अपेक्षित होतं,' असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
'या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे,' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
कर्मचाऱ्यांचे पगार 50 टक्क्यांवर आणलेत
मोठे आर्थिक संकट येणार शिस्त पाळले नाही तर
सरकार ही काही करु शकत नाही कारण हे गरजेच आहे
लॉकडाऊन मुळे लोकांना नोकरीची भीती आहे
जे शिस्त पाळत नाही त्यांच्यामुळे इतरांवर ही परिस्थिती येते
व्हॉट्सअॅप वर कोणीही काहीही औषध सांगतायेत ... डॉक्टर मेहनत घेऊन काम करतायेत
डॉक्टर, महावितरण, शेतकरी, सरकार, पोलीस यांचे आभार
लोकांना गांभीर्य कळत नाही
वैद्यकीय यंत्रणा कशी राबवली जात आहे, बाधित किती आहे या बाबत सरकारने बोलले पाहिजे
असा प्रसंग कोणाच्यावर आला नव्हता
हे वातावरण कोणी पाहिले पण नव्हते
अशी शांतता 92-93 च्या दंगलीला पक्ष नव्हती
अमेरीकेत 30 लाख लोकांनी हत्यारं घेतली
भारतात ती परिस्थिती नाही
पोलिसांवर हात टाकले जातात
मर्कजच्या घटनेतील लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा