Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

मालेगावमध्ये कोरोनामुळे एकाचा बळी ; पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शहरासह नाशिक जिल्ह्यात खळबळ !



नाशिक:मालेगाव प्रतिनिधी जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित दोन रुग्ण आढळले होते. मात्र आज मालेगावात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने आता जिल्ह्यात रुग्णांची संख्या सात वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासन मार्फत देण्यात आली आहे. अचानक पाच रुग्ण समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

कोरोनाच्या पहिल्या बळीने जिल्हा हादरला !
काल पहाटे मालेगावात एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तपासणीसाठी पाठवलेले अहवाल सायंकाळी प्राप्त झाले असता त्यात रुग्णाचा मृत्यू कोरोना मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. मृत व्यक्ती दोन महिन्यापूर्वी सौदी अरेबियामध्ये यात्रेसाठी जाऊन आल्याचे समजते तर चौघांची हिस्ट्री अजून समजू शकली नाही. मालेगावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय, मालेगाव येथे उपचार सुरू असून जिल्हाभरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध