Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

सेवा फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्याला आर्थिक मदत



परतूर प्रतिनिधी: तालुक्यातील पिंप्रुळा येथील अपंग शेतकरी वचिष्ट मुंजाजी गाडगे यांच्या घराला भीषण आगीत वर्षभर कबाड़ कष्ट करुन पिकवलेले कापुस तूर सोयाबीन तसच शेतीची अवजारे पंप स्कुटी सर्व घरातील जीवनावश्यक साहीत्य व घरसंसार जळून खाक झाला आधिच असलेलं लाँकडाऊन व आग्नितांडव आशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले आहे. या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत त्या कुटुंबियांना एकसष्ठ हजारांचा धनादेश देण्यात आला.
 
यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तालुका कृषी अधिकारी एस.एन. पौळ, पालिका मुख्यधिकारी विक्रम मांदुर्गे, व सेवा फाउंडेशनचे संजय चव्हाण, अशोक तनपुरे, सचिन भिसे, शंकर देवशटवार, महादेव काळे ,विठ्ठल झोरे, पदाधिकारी यांच्या समवेत धनादेश सुपूर्द करण्यात आला.
 
आज घडीला सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सदस्यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याचा संकल्प केला व सर्व सदस्यांनी पुढाकार घेत मदत उभा केली. योगदानातून त्यांना संसार उपयोगी वस्तू,शेतीकरिता बी बियाणे व आर्थिक व्यवहार करणे थोडेफार सुलभ होईल.

यापुढेही मदत जमा करून आवश्यक आणि योग्य त्या संकटात सापडलेल्या मदत करण्याचा संकल्प सेवा फाउंडेशन करीत राहील. संजय चव्हाण, संचालक सेवा फाउंडेशन परतूर
 
फोटो ओळी सेवा फाउंडेशनच्या वतीने आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश देताना उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तालुका कृषी अधिकारी एस.एन. पौळ, पालिका मुख्यधिकारी विक्रम मांदुर्गे, व सेवा फाउंडेशनचे संजय चव्हाण, अशोक तनपुरे, सचिन भिसे, शंकर देवशटवार, महादेव काळे ,विठ्ठल झोरे, पदाधिकारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध