Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
ग्रामपंचायत कडून त्या शेतकरी कुटुंबियांना मदत
परतूर प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्रुळा येथील दिव्यांग शेतकरी वचिष्ट मुंजाजी गाडगे यांच्या घराला आग लागली.. भीषण आगीत वर्षभर कबाड़ कष्ट करुन पिकवलेले कापुस तूर सोयाबीन तसेच शेतीची अवजारे पंप स्कुटी सर्व घरातील जीवनावश्यक साहीत्य, घरसंसार आगीत जळून खाक झाला या शेतकरी कुटुंबाना आर्थिक मदतीचा ओघ मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मदतीचा धनादेश देण्यात आला. गावात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क,स्यानिटायझर वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांना प्रोत्साहनपर अनुदान वाटप केले आहे.
सध्या आधिच असलेलं लाँकडाऊन व आग्नितांडव आशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून 5000/- पाच हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच श्रीमती अनिता बद्रीनाथ आवटे, ग्रामसेवक व्ही. एस. वानखडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य शिवाजी अंशीराम चाळक, बाबुराव भाऊराव गाडगे, विलास गाडगे ,रामेश्वर बद्रीनाथ आवटे हे उपस्थीत होते.
सदरील घटना खूप दुःखदायक आहे आपण जमेल तशी व ज्या गोष्टीची गरज आहे त्या स्वरूपात नागरिकांनी मदत करावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला त्या योगदानातून त्यांना संसार उभा करून उपयोगी वस्तू, शेतीकरिता बी बियाणे व आर्थिक व्यवहार करणे थोडेफार सुलभ होईल.यामुळे दानशूर नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन ग्रामसेवक व्ही. एस. वानखडे यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा