Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

एकही उपाशी राहणार नाही याची काळजी घेऊ - आ.डॉ.संजय कुटे



शेगावात गोरगरिबांच्या घरी जेवण वाटप सुरू अधिकाऱ्यां कडून जनजागृती व उपाययोजनांचा आढावा

शेगाव प्रतिनिधी:कोरोना व्हायरासने सर्वत्र थैमान घातले असल्याने देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउन केले आहे त्यामुळे गोरगरीब जनतेच्या पोटाची खळगी भरणे कठीण झाल्याने आ.डॉ.संजय कुटे यांनी शेगावात गोरगरिबांना जेवण वाटप सुरू केले असून जनतेने घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे, केंद्र सरकार आवश्यक ती मदत देत असून जनधन खात्यात पाचशे रुपये, शेतकऱ्यांना दोन हजार यासह प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ यासारख्या विविध योजना देत आहे तर एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची भाजप काळजी घेत असून सामाजिक सेवाभावी संस्था, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते देखील गोरगरिबांना जेवणाची व्यवस्था करीत आहेत असे प्रतिपादन आ.डॉ.संजय कुटे यांनी यावेळी केले.

      
शेगावात ५ एप्रिल रोजी आ.डॉ.संजय कुटे यांनी आरोग्य अधिकारी तसेच तहसीलदार श्रीमती शिल्पाताई बोबडे, ठाणेदार संतोष ताले या अधिकारी वर्गाकडून कोरोनाच्या जनजागृती व उपाययोजना बाबत आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना केल्या त्यानंतर अहिल्याबाई होळकर शाळेतील गोरगरिबांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली व शिवभोजन कक्षाची पाहणी केली. शहरात गो-ग्रीन क्लब कडून सुरू असलेल्या सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करून काही मदत लागल्यास सांगा असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष सौ.शकुंतलाताई पांडुरंग बूच, माजी नगराध्यक्ष तथा भाजपनेते शरदसेठ अग्रवाल, भाजपनेते पांडुरंग बूच, माजी शिक्षण सभापती संजय कलोरे, स्थयी समिती सदस्य पवन महाराज शर्मा, राजू अग्रवाल, शहर सरचिटणीस दिपकदादा धमाळ, कमलाकर चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रोहित धाराशिवकर माजी नगरसेवक अरुण चांडक, विजय यादव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष लिप्ते, महादेव पोटदुखे, मंगेश फुसे, विजय पाचपोहे यांची उपस्थिती होती.

अन..आमदारांचा फोटो काढू देण्यास नकार
आ.डॉ.संजय कुटे यांनी शेगावात गोरगरिबांना घरपोच जेवण पुरविण्याची सुविधा सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी रामदेवबाबा नगरमध्ये स्वतः आमदार जेवण पुरविण्यासाठी गेले असता यावेळी पत्रकार व कार्यकर्ते फोटो काढत असल्याचे पाहून आमदारांनी जेवण वाटप करतानाचा माझा फोटो काढू नका हे माझे कर्तव्य आहे असे सांगून फोटो काढू देण्यास नकार दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध