Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ एप्रिल, २०२०

जळगाव महापौरांनी केली भाजी बाजाराच्या जागांची पाहणी


दोन विक्रेत्यांमध्ये असणार २० फुटांचे अंतर ; गर्दी टाळण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी:जळगाव शहरात जमावबंदीचे आदेश असतांना भाजी बाजारात गर्दी होत असल्याने महापौरांनी आयुक्तांना खुल्या मैदानावर भाजी बाजार भरविण्याच्या मागणी केली होती. त्यानुसार आज महापालिकेने जी. एस. मैदान व रामदास कॉलनीच्या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर आखणी केली. महापौर भारती सोनवणे यांनी जागांची पाहणी केली.

“कोरोना’चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरलेला असून महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून गर्दी करू नका असे स्पष्ट आदेश असतांना देखील भाजी बाजारात नागरीक गर्दी करत आहे. 

या गोष्टीचे गांभीर्य महापौर भारती सोनवणे यांनी लक्षात घेवून आयुक्त सतीश कुलकर्णी यांना महापालिकेच्या खुल्या जागांवर भाजी बाजार भरविण्याचे सुचना पत्राद्वारे केली होती.

रामदास कॉलनी, जी. एस मैदानावर आखणी महापौरांच्या सुचनेची महापालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेत आज सकाळी जी. एस. मैदान, रामदास कॉलनीचे महापालिकेच्या मालकीच्या खुले मैदानाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री. कांबळे तसेच हॉकर्स संघटनेचे प्रभाकर तायडे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन मैदानांवर भाजी व फळ विक्रेत्यांना बसण्यासाठी आखणी केली.

दोन दुकानात वीस फुटाचे अंतर
महापालिकेतर्फे जी. एस. मैदान येथे सुमारे 50 हॉकर्स बसतील अशी आखणी केली आहे. यात दोन हॉकर्स बसतील असे 20 फुटाचे अंतर ठेवले जाणार आहे. तसेच ग्राहकांना ठरावीक अंतर ठेवण्याचे आखणी केली आहे. रामदास कॉलनीच्या मैदानावर देखील सुमारे 30 ते 35 हॉकर्स बसतील अशी सुविधा केली जात आहे.

मनपा शुल्क आकारणार नाही
कोरोना मुळे सुरू असलेले “लॉकडाऊन’चा काळात भाजी-फळांच्या दुकानावर गर्दी होवू नये यासाठी तात्पुरती सोय महापालिका त्यांच्या मालकीच्या मैदानावर हॉकर्स विक्रेत्यांना दुकाने लावण्यासाठी सोय करत आहे. यासाठी बाजार शुल्क महापालिका आकारणार नाही. त्यानुसार शहरात जुनी नगरपालिकेची जागा, मानराज पार्क येथील मैदान आदी मनपाच्या मोकळ्या मैदानावर अशा प्रकारच्या बाजार तयार केले जाणार आहे.

गर्दी टाळण्याचे महापौरांचे आवाहन
भाजी-फळ दुकानांवर नागरिक विनाकारण गर्दी करत असून कोरोना बाबत ही चिंताजनक गोष्ट आहे. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून मोकळ्या मैदानात सुटसुटीत बाजार लवकरच तयार केला जाणार असून गर्दी न करता गर्दी टाळण्याचे आवाहन यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध