Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ एप्रिल, २०२०

बंधु भगिनिंनो, लिहिते व्हा एक आवाहन



मुंबई:प्रतिनिधी समाजाचे वर्तमान पञ म्हणून "तरुण गर्जना" आज संपूर्ण महाराष्ट्रातील भोई समाज बांधवात आपली अमिट अशी छाप सोडत आहे. भोई समाजातील विविध बातम्या या वर्तमान पत्रात नियमित प्रकाशित होत आहे. त्यासोबतच आपल्या समाजातील प्रतिभावंत लेखक,कवी, पत्रकार या वर्तमान पञात विविध विषयावर समाज प्रबोधनात्मक लिखाण करीत आहेत. अजूनही अनेक प्रतिभावंत लेखक, कवी, पत्रकार आपल्या समाजात आहेत; परंतु त्यांना योग्य संधी न मिळाल्यामुळे त्यांचे लिखाण प्रकाशित झाले नाही.

वर्तमानपत्रात आपला लेख किंवा कविता छापून यावी अशी अनेक लेखक, कवीची इच्छा असते; परंतु मोठे वर्तमानपत्र नवोदित लेखक किंवा कवीची दखल घेत नाहीत. आम्ही "तरुण गर्जना" या आपल्या समाजाचं हक्काचे वर्तमान पञ मात्र अश्या सर्व लेखक, कवी, पत्रकार, सामाजिक विषयावर लेखन करणारे समाजबांधव यांच्यासाठीच चालवीत आहोत. हे वर्तमान पञ समाजबांधवांचे स्वतंत्र व्यासपीठ आहे. या वर्तमान पञात आपण आपले विचार समाजासमोर प्रभावीपणे मांडू शकता आणि याच्यासारखे समाजप्रबोधनाचे दुसरे प्रभावी माध्यम नाहीं.

ज्यांना लेखनाची आवड आहे अशा सर्व समाज बंधुभगीनिंनी आपले लेख, इतर सामाजिक साहित्य आमच्याकडे पाठवा आम्ही नक्कीच त्याची सामाजिक दखल घेऊ. ९८५०४८६३४०, ९५५२२१५९९९

आपला स्नेही: 
श्री अर्जुनभोई- मुंबई, कार्यकारी संपादक, तरुण गर्जना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध