Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

धडगाव शहरात व्यापाऱ्यांकडून सोशल डिस्टिंगचे काटेकोरपणे पालन(पोलीस मित्र बजावत आहेत महत्त्वाची भूमिका)



धडगाव प्रतिनिधी:कोरोना संदर्भ लक्षात घेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशात 21 दिवसाच्या कर्फ्युचे आवाहन केले आहे.परन्तु अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय सुद्धा शासनाने दिला आहे त्यात किराणा,भाजीपाला सारख्या अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गर्दीला आळा बसावा व सोशल डिस्टिंगचे पालन व्हावे यासाठी अक्राणी तालुक्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी पोलीस मित्र संकल्पना राबवण्याचा निर्णय धडगाव शहरात घेतला त्या अनुषंगाने धडगाव शहरातील कर्तृत्ववान अश्या 13 पोलीस मित्रांची निवड या माध्यमातून करण्यात आली.गरज भासल्यास आणखी कर्तृत्ववान तरुणांची पोलीस मित्र म्हणून निवड करू अशी ग्वाही धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी दिली.
   
किराणा व भाजीपाला सारख्या दुकानावर गर्दीला आळा बसवण्यासाठी पोलीस मित्र संकल्पना राबविण्यात आली आहे.प्रत्येक किराणा व भाजीपाला सारख्या अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी 1 पोलीसांना कार्यरत ठेवून ग्राहकांना सोशल डिस्टिंगचे पालन करण्यासाठी पोलीस मित्र अत्यावश्यक सेवेला सहकार्य करतील व अत्यावश्यक सेवेचे दुकानदार ग्राहकांना त्यांची सेवा देतील हीच बाब लक्षात घेत पोलीस मित्र संकल्पना राबवण्यात येत आहे असे मत पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी मांडले आहे.

शहरात होणाऱ्या गर्दीमुळे किराणा दुकानदार व भाजीपाला दुकानदार यांना ग्राहकांना सांभाळणे अशक्य होत होते परन्तु पोलीस मित्र संकल्पनेमुळे पोलीस मित्र दुकानावर गर्दीला व्यवस्थितरित्या हाताळतांना निदर्शनास येत आहे त्यामुळे दुकानदारांना सोशल डिस्टिंग ठेवून ग्राहकांना सेवा देण्यात सोयीस्कर होत आहे.

व्यापारी असोसिएशन धडगाव उपाध्यक्ष:-रविंद्र पारशी पराडके


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध