Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

शेगांव शहर नागरिकांनकडून फुलाने स्वागत




शेगांव प्रतिनिधी: पोलीस यांची ऑन ड्युटी २४ तास सेवा सुरू आहे .पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत.तर ,डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारीही पायाला भिंगरी लावून,डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या उपचारासाठी तयार आहेत . 

देशभरातील बहुतांश मंदिरे बंद ठेवण्यात आली असून देऊळ बंद अशीच परिस्थिती दिसून येतेय . मात्र , देशातील हॉस्पीटल आणि पोलीस ठाणे मात्र सुरू आहेत . आपले कर्तव्य बजावताना , देशसेवेसाठी पांढरा कोट अन् खाकी वर्दी तैय्यार आहे . त्यातच , पोलिस आणि डॉक्टर्सकडूनही नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे .आम्ही तुमच्यासाठी कर्तव्यावर आहोत ,तुम्ही आपल्यासाठी घरी बसा . . . असा संदेशच पोलीस आणि डॉक्टर्सने दिला आहे . 

पोलीस आणि डॉक्टर्सकडून नागरिकांना भावुक आवाहन करण्यात येत आहे . नागरिकांनी फुलाने स्वागत करून  पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेल  सलाम केला आहे . तर डॉक्टरांच्या सेवेला मनापासून धन्यवाद दिलंय .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध