अमळनेर i प्रतिनिधी
– (पंकज पाटील ) ग्रामीण भागात
कोरोनोचा प्रार्दुभाव पसरू नये म्हणून अमळनेरचे
गटविकास अधिकारी हे संपूर्ण तालुक्यात प्रयत्न करत आहेत.
ग्रामीण भागातील गावठी दारू मुळे मात्र संध्याकाळी गावागावांत गर्दी होत असल्याचे चित्र
आहे.
ग्रामीण भागामध्ये विशेषतः
युवापिढी मद्य प्राशनाच्या आहारी गेल्याने कोरोनो काळात महिलांना त्रास होत आहे
.अवैद्य दारू बंदी साठी अमळनेर गटविकास
अधिकारी संदीप वायाळ यांनी विडा उचलला आहे.त्यांची गाडी चक्क ग्रामीण भागातील
शेतांमध्ये धावू लागली आहे. स्थानिक गावांतील नागरिकांकडून माहिती मिळाली की, बीडीओ
त्या ठिकाणी स्वतः जावून त्या हात भट्या उद्ववस्त करत आहेत.
पातोंडा येथे अवैध दारू
विक्री करणाऱ्यांनी मोठा धुमाकूळ घातला होता त्याची तक्रार अनेक वेळा पोलिसांकडे व
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करून देखील लक्ष दिले जात नव्हते . अखेर युवकांनी अमळनेरचे
गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करत त्यांना माहिती दिली .बीडीओ साहेबानी युवकांना घेवून चक्क
हजारो रुपयाची दारू पातोंडा येथे नष्ट करत आतापर्यंत चार दिवसात तालुक्यातील अठरा अवैध दारू ठीये उध्वस्त केलेत.
अवैद्य दारूस प्रतिबंध
करण्यासाठी राज्यस्तरीय ,जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली
समिती गठीत करण्यात आलेली असते .या समित्या करतात तरी काय ?अमळनेरच्या बीडीओना तालुक्यात
अवैद्य दारूचे साठे सापडतात तेच साठे राज्य
उत्पादन शुल्क वाल्यांना का दिसत नाही ? अवैद्य दारू विक्री कुणाच्या
पाठबळावर होत आहे . हा देखील अभ्यासाचा विषय
आहे.यात काही आर्थिक गणित तर लपलेली नसतील ना ?
खर तर दारू बंदी हे काम राज्य
उत्पादन शुल्क वाल्यांचे असून त्यांना महाराष्ट्र शासनाने जबाबदारी दिली आहे.... माफ
करा..... दारू बंदी साठी कार्य करण्याची सक्त नियमावली गृह विभाग महाराष्ट्र राज्य
यांनी १ मार्च २०१७ रोजी बनवून दिली आहे .पण प्रत्यक्षात तसे होत नसल्याने दिसून
येत आहे .
खेड्यात दारू विक्री मुळे होत
असलेल्या गर्दी मुळे कोरोना गावांत प्रवेश करू नये म्हणून बीडीओ यांची गाडी दारूचे
ठीये उध्वस्त करण्यासाठी चक्क शेतात धावत असून राज्य उत्पादन शुल्क वाल्यांची गाडी
मात्र घरातच आराम करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे .असच म्हणाव लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा