Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ एप्रिल, २०२०
शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथे अवैध हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त
शिरपुर:टेकवाडे प्रतिनिधी:कोरोनाचा संकटामुळे संपूर्ण देश लाॕकडाऊन झाल्यामुळे जीवनाश्यक वस्तुंचे दुकाने सोडुन सर्वच बंद करण्यात आले आहे.
देशी,विदेशी,परमिटबार बंद असल्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी हातभट्टी दारूकडे वळवला आहे.यामुळे तळीरामांकडुन गावठी दारूची मागणी वाढली आहे.मात्र या तळीरामुळे खेडेगावांना कोरोनाची भिती निर्माण झाली आहे.त्यांच्या कडुन शोसियलडंस्टींगचे नियमांचे उल्लंघन सर्रासपणे होत आहे.एकीकडे पोलिस यंत्रणा दीड महिन्या पासून डोळ्यांत तेल घालुन, आपल्या जीवाची परवा न करता सर्वसामान्य जनतेचे रक्षण करीत आहेत.
या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.परंतु गावठीहातभट्टी दारू विक्रेतांनी याचा गैरफायदा घेतल्याचे दिसुन येत आहे.
भरपूर दिवसापासून टेकवाडे गावात अवैध गावठी हातभट्टीचे दहा ते पंधरा अड्डे सुरू होते.मात्र आज पोलिसांनी ते उध्दवस्त करून नष्ट केले..परिसरात अवैध दारू विक्रेत्यानी थैमान घालुन गावातील तरूण युवकांना व्यसनाधीन केले आहे.
या कारवाईमुळे ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.त्यामुळे अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यांचे दाबे दणदणाले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा