Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ एप्रिल, २०२०
शिरपूर शहरात मांडूळ तस्करसह १ कोटी २० लाख किमतीचे ६ दुर्मिळ मांडूळ जप्त,
शिरपूर शहर पोलिसांची गुप्त माहितीवरून प्रशंसनीय कामगिरी
शिरपूर:प्रतिनिधी:शिरपूर शहर पोलीसांना मिळालेल्या गोपीनय माहीतीवरून शहरातील एका घरावर कार्यवाही करीत दोन तोंडी मांडूळ जातींचे ६ साप ताब्यात घेण्यात आले आहेत.ही कार्यवाही दि २७ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली या कार्यवाहीत जप्त करण्यात आलेल्या एक मांडुळची अंदाजीत किंमत २० लाखापर्यंत आहे.यामागे शिरपूर शहरात आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की ,शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना एका गुप्त बतमीदारामार्फत माहिती मिळल्यावरून शिरपूर शहरातील ईदगाह नगर भागातील शाबीर शेख यांच्या घरावर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धाड टाकण्यात आली.या कारवाईत शाबीर शेख यांच्या घराच्या छतावर सहा ते सात फुटाच्या एका लाकडी खोक्यात अतिदुर्मिळ मांडूळ जातीचे साप तस्करी करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले आढळून आले.या दुर्मिळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. या दुर्मिळ मांडूळ जातीच्या एका सापाची किंमत अंदाजे २० लाख रुपये आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील,पीएसआय संदिप मुरकुटे,पोना अनिल शिरसाठ,पोलीस शिपाई संदीप रोकडे,महिला पोलीस अनुराधा धाकड,आदीनी ही कारवाई केली.
याप्रकरणी संशयित शबीर शेख वय ४१ याला ताब्यात घेण्यात आले.असून सर्प मिंत्रांच्या साहाय्याने अंदाजित १कोटी २० लाख रुपये किमतीचे ६ दुर्मिळ मांडूळ जातीचे साप ताब्यात घेण्यात आले आहेत. उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.वनविभागाला सुचित करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा