Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

रक्तापलीकडच्या मैत्रीत पोलीसाने दाखवली माणुसकी जिवंत



रावेर तालुक्यातील खिर्डी येथील 
सचिन प्रभाकर पाटील हल्ली मुक्काम पुणे यांनी लाँक डाउन काळात विपरीत
परीस्थिती आपले वडील प्रभाकर पाटील हे मानसिक आजाराने त्रस्त असुन ते नोकरी निमित्त पुणे येथे वास्तव्याला असल्याने कोरोना मुळे सर्वत्र संचारबंदी आहे अश्या परीस्थितीत जिवनावश्यक औषधी ही जळगाव येथुन आणायची होती.

मग काय करावे या विवंचनेत त्यानी आपले निंभोरा येथील मित्र पत्रकार दस्तगीर खाटीक यांना मोबाइल वर याबाबत माहीती दिली आणि त्यांनी सोशल मिडीया च्या माध्यमातुन व्हाँटसअँप द्वारे संदेश दिला.व त्यास निंभोरा पोलीस संदीप पाटील यांनी संपर्क करत औषधी जळगाव येथुन आणुन दिली.व स्वता:हा पुढाकार घेत माणसाने माणसाशी कसे वागावे हे दाखवले.

अत्यंत व्यस्त व दमछाक होत असलेल्या ड्युटीत देखील वेळ काढत संदीप  पाटील (नेमणुक निंभोरा पोलीस ठाणे यांनी हे दैवदुत रुपी पुढे येत हे करुन दाखवले म्हणुन त्याचे सर्वत्र कोतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध