Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

निंभोरा येथे आक्षेपार्ह पोस्ट व फोटो टाकल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल.



खिर्डी प्रतिनिधी रावेर तालुक्यातील निंभोरा येथे व्हाट्सअप्प ग्रुप वरती संदीप अशोक खाचणे (वय 39 ) राहणार खाचणे वाडा याने "यंग जनरेशन" निंभोरा ग्रुप वर हिंदू व मुस्लिम धर्मामध्ये शत्रुत्व व द्वेषभावना निर्माण होईल अश्या आशयाचे मेसेज व फोटो प्रसारित केल्याने त्याचे विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला पो हे.का.राकेश वराडे यांचे फिर्यादी वरून भाग ६ गु.रजिस्टर नंबर ०९/२०२० भादवी कलम ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी फैजपूर नरेंद्र पिंगळे व सा. पो.निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास कोल्हे ,बाळू पाटील,राकेश वराडे,स्वप्नील पाटील,सुनील वंजारी, संदीप पाटील यांच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले आहे.

तरी निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे सा.पो.नि यांनी जनतेस आव्हान केले आहे की कोणीही आपले मोबाइल फोन वरून कोरोना या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने कोणीही आक्षेपर्य मेसेज,फोटो,तसेच कुठलीही जाती धर्मामध्ये द्वेषभावना निर्माण होईल अशा आशयाचे मेसेज व फोटो प्रसारित करू नये.तसे केल्यास कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध