Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

जिल्हयातील विविध ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडी




धुळे:प्रतिनिधी संपुर्ण भारतासह महाराष्ट्र राज्यात कोरोना या संसर्ग जन्य साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन (टाळेबंदी) करण्यात आली असून या पार्श्वभुमीवर कोठे हि अवैध धंदे अगर जिवनावश्यक वस्तुचे विक्री शिवाय इतर कोणती हि दुकाने उघडी राहणार नाहीत म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने आपली कंबर कसली आहे दिनांक ३/०४/२०२० रोजी मुकटी ता.जि.धुळे शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रं.०६ वर हॉटेल पुजा येथील बीअर बार व परमिट रुम मध्ये चढया भावाने दारु विक्री सुरु आहे अशी बातमी पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बुधंवत यांना मिळाली त्या वरुन पथकातील पोसई. अनिल पाटील, पोकॉ योगेश जगताप , किशोर पाटील श्रीशैल जाधव प्रशांत माळे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागा धुळे चे निरीक्षक महाडीक दुय्यम निरीक्षक टी. एस देशमुख जवान आर.एन. सोनार यांनी हॉटेल पुजा वर साधे गणवेशातील पोलीस कर्मचारी पाठवुन बॅग पायपर १८० मि.ली.ची बाटली खरेदी केली असता ती २३५/- रुपये कि.ला दिली वास्तवीक नमुद बाटलीची एम.आर.पी.हि १३०/- रुपये येवढी आहे म्हणजे १०५/- रुपये एवढया चढया दराने विक्री करतांना तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन करतांना मिळुन आला म्हणुन हॉटेलचे मालक नामे सारंग विश्वास पाटील वय -२७ रा.मुकटी ता.जि.धुळे यांचे विरुध्द साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ महा.(कोवीड -१९) उपाय योजना नियम २०२० चे नियम ११ व भादवी कलम १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ मधील पोट कलम ग (सी) ड (एम) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व दुस-या कारवाईत नरडाणा गावात गाव दरवाजा जवळ इसम नामे पांडुरंग भास्कर पाटील रा.नरडाणा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला सुगंधीत विमल पान मसाला व तंबाक जन्य पदार्थ चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळंगत आहे 

बाबत.पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बुधवंत यांना बातमी मिळाली सदर बातमी प्रमाणे पोहेकॉ. सुनिल विचुरकर, पोकॉ. मनोज पाटील, पोकॉ. चेतन कंखरे अशांनी सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता सदर इसमाचे ताबेकब्जात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला सुमारे ३२०५०/- रुपये कि.चा. सुगंधीत विमल पान मसाला व तंबाकु जन्य पदार्थ मिळुन आल्याने तो ताब्यात घेवुन सदर इसमा विरुध्द अन्न व औषध प्रशासन विभागाकडेस कारवाई कामी अहवाल सादर करण्यात आला आहे. 

पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.नमुद कालावधीत लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-यावर यापुढे देखील प्रभावी कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासना मार्फत कळविण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध