Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
भोई समाज सेना महाराष्ट्र तर्फे गोर गरीब, कष्टकरी जनतेला किराणा व भाजी पाला वाटप
धुळे प्रतिनिधी कोरोना कोवीड 19 च्या प्रतिबंधासाठी सर्विकडे सोशल डिस्टंसिंग व संचारबंदी केल्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हातावर मोलमजुरी करुन गुजराण करणा-या गरीबांना हाताला काम नसल्याने व गरीबांची परिस्थिती केविलवाणी असल्याने भोई समाज सेना तर्फे गोरगरीबांना गहू, बाजरी, साखर, तेल, भाजीपाला वगैरे गोष्टींचा वाटप करण्यात आला.यात सोशल डिस्टंसिंग ठेऊन आणि सॅनिटायजर चा वापर करून योग्य ती काळजी देखिल घेतली गेली.
या कार्याची दखल घेत खासदार तथा मा. संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भामरे साहेब व महानगरपालिका सभापती सुनिलभाऊ बैसाणे साहेब यांनी भोई समाज सेना पदाधिकारींची भेट घेतली आणि या बिकट परिस्थितीत भोई समाज सेना तर्फे हाती घेण्यात आलेल्या या कार्याचे विशेष कौतुक करुन संस्थापक अध्यक्ष भिलेशभाऊ खेडकर तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे यांच्या सोबत चर्चा केली. किराणा व भाजीपाला वाटपाचा कार्यक्रम सुरू असुन दोन दिवसांत २५० ते ३०० गोरगरीब बांधवांपर्यंत ही मदत घरपोच पोहोचविण्याचे कार्य होणार आहे.
हे लोकं परिस्थितीने हवालदिल आहेत, गरीब आहेत,परंतु स्वाभिमानी आहेत. त्यांना अन्नधान्य तथा भाजीपाला वगैरे वाटप करतांना फोटो सेशन करणे योग्य नसल्याने कोणाचेही किराणा घेतांनाचे फोटो काढले नाहीत, याबाबत त्या समाजबांधवांनी देखील मनस्वी आनंद व्यक्त केला आणि आभार मानले.
या कार्यासाठी भोई समाज सेना संस्थापक अध्यक्ष भिलेश खेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहित शिंगाणे, मयुर मोरे, प्रदेश उपाध्यक्ष पूनमचंद मोरे,कायदेशीर सल्लागार योगेश मोरे, जिल्हाध्यक्ष अशितोष वाडीले, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल वाडीले, धुळे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, नाना जाधव, नारायण काका मोरे, नाना वाडीले, बंटी मोरे, कृष्णा मोरे, कांतीलाल मोरे, अजय मोरे, हरीश मोरे, स्वप्नील मोरे,रोहिदास मोरे, देविदास मोरे, मुकेश खेडकर, महेंद्र मोरे, विक्की मोरे आदी बांधवांनी मदत केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा