Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

अखेर शिंदखेडातील युवकास तपासणी नंतर सोडले



शिंदखेडा (प्रतिनिधी) शिंदखेडा शहरातील त्या युवकास अखेर जिल्हा प्रशासनाने काल रात्री 3 एप्रिल  रोजी सोडून दिले असून त्यात आधीच होमकारण टाईम करण्यात आले होते दरम्यान त्यास काहीही झालेले नसून काल रात्री त्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी नंतर सुटका झाल्याची माहिती मिळाली आहे आधीच हा युवक होमकारण टाइम' मध्ये  असल्याने त्या युवकास दरम्यान जिल्हा प्रशासनाने त्यास रात्री परत शिंदखेडा येण्यासाठी कुठलीही व्यवस्था न केल्याने त्याच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे

शिंदखेडा शहरात कोरोना संशयित रुग्ण असल्याची माहिती काल प्रशासनाला मिळाली होती त्यावरून प्रशासन आणि त्याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतले होते व धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते त्यामुळे  शहरात खळबळ उडाली होती देशातील कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे नागरिक भीतीग्रस्त असून संपूर्ण पणे लोक डाउन असल्याने शिदखेडा शहरात मात्र अद्याप अशी परिस्थिती उद्भवलेली नाही दरम्यान धुळे जिल्ह्यात अद्यापही एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती देखील मिळाली आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध