Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

दहिवद विश्व मानव रूहानी केंद्र तर्फे गोर गरीब व गरजूंना मोफत अन्नखाद्य पाकिटे वाटप




शिरपूर:प्रतिनिधी:तालुक्यातील दहिवद येथील विश्व मानव रूहानी केंद्र च्या वतीने गोरगरीब व गरजूंना मोफत अन्न खाद्य पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे.

सध्या जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 ला साथीचा रोग जाहीर केला असल्याने संपूर्ण जगात व आपल्या भारत देशात त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. असंख्य गोरगरीब, गरजू व सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणाची देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर विश्व मानव रूहानी केंद्र शाखा दहिवद च्या वतीने दि. 3 एप्रिल 2020 पासून गोरगरीब व गरजूंना मोफत अन्न पाकिटांचे वाटप करणे सुरू झाले आहे. काल दि 3 एप्रिल रोजी दहिवद विश्व मानव रूहानी केंद्राचे उपाध्यक्ष तथा शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावर बिजासनी घाटात व ठिकठिकाणी अन्न पाकिटे वाटप करण्यात येत आहे. याकामी उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन यांच्यासह प्रशासनाचे देखील मार्गदर्शन लाभत आहे. दि. 10 एप्रिल पर्यंत नियमितपणे हे अन्न पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विश्व मानव रूहानी केंद्र द्वारा विविध प्रकारचे सेवाकार्य नेहमीच करण्यात येते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध