Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

शहर नाभिक दुकानदार संघटने तर्फे गरजूंना मोफत धान्य वाटप



उंटावद (प्रतिनिधी):देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे गोरगरिबांना बाहेर जाणं शक्य नसल्याने त्या अनुषंगाने शिरपुर शहर नाभिक दु.संघ.तर्फे शि.ता.प. परिसरातील समाजातील 50 गरजू कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.  

सलून व्यवसायामध्ये असलेल्या गरीब नाभिक बांधव व कामगारांची तसेच समाजातील विधवा महिला, निराधार, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे यांची  झालेली आर्थिक ओढातान पाहता संघटनेचे शहराध्यक्ष रामचंद्र येशी, उपाध्यक्ष चेतन शिरसाठ, योगेश येशी,भुपेश सोनगडे, नंदलाल वारुळे, योगश शिरसाठ, विजय पवार सावळदेकर, महेंद्र शिरसाठ, दिपक सैंदाणे, हेमंत सोनवणे, पंकज वारुळे, जयेश सुर्यवंशी यांनी एकत्र येत मोफत धान्य वाटपाचा निश्चय केला.  

त्यानुसार ग्रामीण भागातील वाघाडी, वाडी, बोराडी, अर्थे, भरवाडे, विखरण, खामखेडे, टेकवाडे, वरूळ, जवखेडा, भटाणे, तऱ्हाडी या गावातील 50 गरजू कुटुंबांना घरपोच मोफत धान्य वाटप करण्यात आले. 

यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध