Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ एप्रिल, २०२०
एका विषाणूने शिकवलं...
जीव निर्मिती अगोदर सृष्टीपेक्षा अति प्राचीन विषाणु आहेत त्यात अंनत प्रकार असु शकतात आता पर्यंत मानवाने बरेचं शोधुन काढलेत त्यात कोरोना नावाचा विषाणु महाभयंकर असा आता अवतरला म्हणजे पूर्वी होता पण आता त्याने मानवात प्रवेश केला तद नंन्तर त्याचा शोध लागला या अगोदर कोरोना नावाने सहा प्रकारचे विषाणु शोधले गेले होते हा कोवीड 19 हा सातवा विषाणु मानवास आढळला... अति सुष्म डोळ्यांना नं दिसणारा मी तर म्हणेल परोपजीवी हा शब्द का वापरला तो आपलं बस्तान निसर्गातील वन्यजीव पशु पक्षी त्यांच्या वर जगतो जसं झाडांवर ईतर वेली जगतात वाढतात त्यांना आपण परोपजीवी वेली असं म्हणतो तसंच प्राण्यांवर जगणारा म्हणुन परोपजीवी सम्बोधलं मला वाटलं तसं ....वन्यजीव हे सुष्म विषाणु जिवाणू यांचं राहण्या ठिकाणं भांडारघर त्यांच्या वास तेथे असतो असं अभ्यासक सांगतात.हे खरंय मग जीव अस्तित्वात येण्या पूर्वी यांचं अस्तित्व कुठं असायचं हा प्रश्न पडतोय. म्हणजे कधीही नष्ट होणारा असंच सातत्याने निर्मिती होतं असते अंनत पटीत अब्जावधीत निर्मिती होतं असली पाहिजे सातत्याने मरत राहतात त्या पटीत निर्मिती सुरूच असते नंन्तर त्यांना वन्यजीव हे घर मिळालं मानवाने त्यांच तेच घर नष्ट केलंय करतोय मग त्यांचा मोर्चा आज मानवाकडे वळत असतो असंच. असं वाटतंय आज पर्यन्त बरेच आजार त्यातुन निर्माण झालेत. प्राण्यांची एक जमात नष्ट झाली तर त्या प्राण्यावर अधिवास करणारे किटाणू दुसरं घर शोधणारच मानवानं असे अंनत प्राणी नष्ट करण्याचा सपाटा लावलाय तर मानवच आज त्यात आज भाजून निघतोय. जसं शक्तिशाली वेक्ती दुसऱ्या वर सतत अत्याचार करत असतो तेव्हा एखादा लहान वाटणारा वेक्ती त्यास संम्पवतो किंवा ईतर सारे एकत्र होऊन त्या अत्याचारीस संपवता. मानव बाबत तसं घडु नये असं वाटतं असेल तर मानवानं आता तरी वन्यजीव किंवा प्राणी संपवणं थांबवलं पाहिजे. निसर्गाने मानवास पण शेळी, कोंबडी, अंडी, मासे. पाळा वाढवा जोपासा मग खा हि प्राणी पण दिलीत ना खाण्यास ज्यांची जास्त पटीत वाढ होतं असते म्हणुन या वेतिरिक्त दुसऱ्या प्राण्यांना हात लावण्याचा मानवास काय अधिकार असं वाटतं. जीव जीवस्य जीवनम सांगितलंय मग का सर्व सृष्टी तील जीव एकट्या मानवास खाण्यास सांगितल्या का तर नाही साखळी असते.कोण कोणाला खायचं हे ठरलंय मग मानवाने तर त्या साखळीतील अनेक जीव नष्ट करून अशी वेळ आणली असं वाटतं. वेळीच सावरलं पाहिजे सारे वन आणि वन्यजीव जोपासना केली तरच खरं वाघाला हरीण शिकारीला राहु दया हरीण मानव शिकार करतोय तर वाघ एक दिवस तुमची शिकार करणारच. असंच सारं जीव जीवनक्रम... सारं सारं एक सुष्म विषाणु शिकवतोय असंच...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055©®
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा