Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
बंद हॉटेलमधील देशी विदेशी दारूवर डल्ल्ला मारणाऱ्या टाकळीच्या तिघा तळीरामांना अटक - चाळीसगाव पोलिसांची कामगिरी
बंद हॉटेलमधील देशी विदेशी दारूवर डल्ल्ला मारणाऱ्या टाकळीच्या तिघा तळीरामांना अटक - चाळीसगाव पोलिसांची कामगिरी
जळगाव प्रतिनिधी:लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याचा फायदा घेऊन तिघा तळीरामांनी हॉटेलपाठीमागील झुडुपांमध्ये मध काढण्याच्या नावाखाली झाडावरून चढून हॉटेलमध्ये प्रवेश करून दोन तीन दिवसात सुमारे 32 हजार रूपये किंमतीची बियर चोरूनही नेली.पण चाणाक्ष पोलीसांच्या नजरेत हा प्रकार लक्षात येताच पोलीसांनी तपास करून तिघा तळीरामांचा मुसक्या आवळल्या. शहरातील भडगाव रस्त्यावर असलेल्या हसतखेळत हॉटेलमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर टाकळी प्र.चा. येथील हसत खेळत या हॉटेलला देशी विदेशी दारु विक्रीचा परवाना आहे.या हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.मात्र कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी देशी विदेशी दारू विक्रीचे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिल्याने हॉटेलमधील देशी विदेशी दारूच्या बाटल्या एका रूममध्ये व बियरच्या बाटल्या दुसऱ्या रूममध्ये फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या.दि.1 एप्रिल रोजी उत्पादन शुल्क विभाग चाळीसगावच्या अधिकऱ्यांनी हॉटेलवर येवून हॉटेल लॉक करून कायदेशीररित्या सील केले होते.त्यानंतर हॉटेलचे चालक दिपक भिकन चौधरी हे दि.13 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हॉटेलवर गेले असता हॉटेलच्या पश्चिमी बाजुचे शटर उचकावलेले दिसले.चौधरी यांनी आत जावून पाहीले असता बियर ठेवलेल्या रूममध्ये बियरच्या फुटलेल्या बाटल्या दिसल्या तसेच दुसऱ्या रूममधील दारूच्या बाटल्याही दिसून आल्या नाहीत. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी हॉटेलची भिंत चढून आत प्रवेश करून शटरचे आतील कुलूप तोडून शटर उघडून 5070 रूपये किंमतीच्या बडवॉयझर माईल्ड कंपनीच्या 26 बाटल्या, 7590 रूपये किंमतीच्या बडवॉयझर स्टींग कंपनीच्या 33 बाटल्या, 6125 रूपये किंमतीच्या किंची फिशर स्ट्रांग कंपनीच्या 35 बाटल्या, 6105 रूपये किंमतीच्या किंची फिशर स्ट्राग कंपनीच्या 33 बाटल्या, 4495 रूपये किंमतीच्या किंची कॅनान 1000 कंपनीच्या 31 बाटल्या व 2625 रूपये किंमतीच्या किंची किंग फिशर कंपनीच्या 21 बाटल्या अशी एकुण 32हजार 10 रूपये किंमतीची देशी विदेशी दारू दि.10/4/2020 चे 11 ते दि.13/4/2020चे 12 वाजेचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने बियरच्या बाटल्या लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या. याप्रकरणी हॉटेल चालक दिपक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघे भडगाव रोडवरील हॉटेल हसत खेळत च्या पाठीमागे दररोज जात असल्याचे परिसरातील नागरीकांना दिसत होते. याबाबत त्यांना हटकले असता त्यांनी झुडुपांमध्ये मध असल्याचा बहाणा केला. या मध काढण्याच्या बहाण्याने त्यांनी हॉटेलपाठीमागे असलेल्या झाडावर चढून आत हॉटेलमध्ये प्रवेश केला व शटरचे कुलूप तोडून तेथे ठेवलेल्या बियरच्या बाटल्यांवर ताव मारला. सलग दोन तीन दिवस जावून त्यांनी हॉटेलमध्येच बियरच्या बाटल्या रिचवल्या. त्यानंतर हे तिघे दारूच्या बाटल्या नदीकिनारी घेऊन तेथेही जात. दररोज बाटल्या चोरण्यापेक्षा एकदम दारूच्या बाटल्या चोरण्याचे त्यंाच्या मनात शिजले आणि या तिघांनी 32 हजार रूपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. तसेच एक आरोपी हा गावात खुलेआम बिअर पित असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाल्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डी वाय एस पी कैलास गावडे, पोलिस निरीक्षक विजय ठाकुरवाड, पो उ नि महावीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बापूराव भोसले, पो कॉ गोपाल बेलदार, विजय पाटील, दीपक पाटील, तुकाराम चव्हाण, विनोद खैरनार यांनी दि 14 रोजी दुपारी टाकळी प्रा चा येथून आरोपी गौतम बबन जाधव, मुकेश रोहीदास दळवी व भुरा आनंदा मोरे रा. टाकळी प्र.चा. यांना अटक केली आहे
तिघा आरोपीना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा