Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

केळी निर्यातीला बाजार समितीस प्रमाणातपत्र देण्याची मुभा द्यावी – कृउबा



रावेर(प्रतिनिधी) केळी निर्यातीला राज्य परिवहन विभागाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्या ऐवजी बाजार समितीचे प्रमाणपत्र देण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी बाजार समितीचे सभापती व संचालक यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या केळी निर्यातीला नव्याने काही नियम लावले आहे. यात आरटीओ कडून देखील सर्टिफिकेट गरजेचे आहे. सदरील प्रमाणपत्र मिळण्यासाठी केळी उत्पादक व वाहतूकदार यांची दमछाक होत आहे. केळी व्यापाऱ्यांना लायसन्स बाजार समितीकडून दिले जाते. 

केळी भाव देखील बाजार समितीच्या नियंत्रणात येतात; त्यानुसार आरटीओ ऐवजी बाजार समितीच्या सर्टिफिकेट वरून केळी निर्यातीला हिरवा कंदील द्यावा. अशी मागणी सभापती श्रीकांत महाजन, संचालक गोपाळ नेमाडे, डी.सी.पाटील, पितांबर पाटील यांनी प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध