Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

कुरखळी ग्रामपंचायतीकडून साबण व सॅनिटाइजर चे वाटप! सदस्यांनी केली ग्रामस्थांमध्ये जनजागृती!



कुरखळी ता.शिरपुर प्रतिनिधी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने काल दि. ४ राेजी, संध्याकाळी सरपंच व सदस्यांच्या हस्ते गावात सॅनिटाइजर व साबण चे माेफत वाटप करण्यात आले. 


यावेळी सरपंच सिताराम भिल, ग्रामसेवक बी एच चव्हाण, उपसरपंच सुनंदा कोळी, सदस्य सुरेश मोरे, जगदीश मोरे, योगिता कोळी, भटाबाई भिल, सुशीलबाई भिल, महारू भिल, आदेश भिल, माजी उपसरपंच अवधूत मोरे, पाेलिस पाटील वसंत बिल्हाडे, कुरखळी ग्रामविकास मंच चे प्रमुख व पत्रकार याेगेश माेरे, उपस्थित हाेते. 

राज्यात कलम १४४ नुसार संचारबंदी चालु आहे.अशा परिस्थितीत ग्रामीण भागात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढु नये. तसेच ग्रामीण जनतेला काेराेना सारख्या गंभीर विषाणू बाबत खबरदारी बाळगता यावी. यासाठी जनजागृती साेबतच प्रादुर्भाव राेखण्याची साधने महत्वाची असल्याने कुरखळी ग्रामपंचायत यांच्या वतीने प्रत्येक घरी फक्त दोन व्यक्ती जात जनजागृती साेबत सॅनिटाइजर व साबण देत अाहेत. 

काेराेना बाबत काळजी, लक्षणे, हेल्पलाईन नंबर आदी विषयांवर गाेरगरीब जनता, गावातील आदिवासी वस्ती वर जावुन मार्गदर्शन करीत आहेत. 

यावेळी कुरखळी येथे सॅनिटाइजर वापराचे प्रात्यक्षिक दाखवुन लाेकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच पाेलिस वाहनातुन गावातील नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये, गावात घाेळका करून उभे राहू नका, साेशल डिस्टन्स पाळा, कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता गरज भासल्यास पाेलिस पाटील, किंवा पाेलिस ठाण्यात संपर्क साधा अशा सुचना केल्या तर कुरखळी येथील युवा व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. तर अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाचे काैतुक केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध