Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

गोरगरीब लोकांसाठी दान केली दोन एकर वांगी,दोन एकर शेवग्याच्या शेंगा




नळदुर्ग प्रतिनिधी :परंडा दि.13 तालुक्यातील शेळगांव  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठमोठे उद्योगपती, राजकीय नेते, सेलिब्रेटी यांनी मोठी देणगी जाहीर केली आहे. परंडा  तालुक्यातील एका गरीब शेतकऱ्याने आपली दोन एकर वांगी, दोन एकर शेवग्याच्या शेंगा दान करून अनेकांना प्रेरणा दिली आहे.

     
हे आहेत, परंडा  तालुक्यातील शेळगांव  येथील गरीब शेतकरी श्री.बापू दिगंबर शेंडकर. त्यांनी आपली दोन एकर वांगी,दोन एकर शेवग्याच्या शेंगा गोरगरीब लोकांसाठी दान केल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे उद्धभवलेल्या बिकट परिस्थितीत काही दलाल गैरफायदा घेत असताना हा शेतकरी  दान करून गोरगरीब लोकांसाठी अन्नदाता ठरला आहे.उस्मानाबाद जिल्हा हा नेहमी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 

तरीही काही शेतकऱ्यांनी हार न मानत दुष्काळावर मात करत, कमी  पावसावर पीक घेतले.गरिबीमुळे जवळ पैशाची अडचण होती, तर नातेवाईक-मित्रमंडळी कडून हात उसने पैसे घेऊन शेतीची योग्य मशागत करून वांगी व शेवगा लावण्याचा निर्णय घेतला, वेगवेगळ्या महागड्या औषधांची फवारणी केली, खत घातले.कष्ट करून चांगले उत्पन्न आले.या उत्पन्नावर मोठ मोठी स्वप्न पाहिली,अखेर स्वप्न स्वप्नच ठरली , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला अजूनही ३०एप्रिल पर्यंत वाढणार आहे.

लॉक डाऊनमुळे आलेले पीक विक्री अभावी तसेच शेतात सडू लागले त्यातच गेली तीन दिवस झाले रोज रात्री अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे,राहिले सहिले नुकसान होतं आहे.लाखो रुपयाचे नुकसान झाले, मूद्द्लदेखील मिळाली नाही शेवटी उसने घेतलेले पैसे परत कसे करायचे हा प्रश्न सतावत आहे .तरी देखील मन घट करून  या शेतकऱ्याने गावातील लोकांना  मोफत वांगी व शेवग्याच्या शेंगा घेऊन जाण्याचे आवाहन केले. 

बऱ्याच लोकांनी आवाहनाला प्रतिसाद दिला, अजूनही भरपूर शिल्लक आहे.शेवटी सदर शेतकऱ्यांने प्रशासनाला आवाहन केले आहे की शेतातील वांगी व शेवग्याच्या शेंगा गरजू लोकांनपर्यंत मोफत पोहच करा.अनेक गोरगरीब लोकांवर तसेच स्थलांतरित लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या पोटासाठी माझ्या पिकांचा वापर झाला तरी मला समाधान आहे, अशी भावना या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध