Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

वसंतराव वडगावे यांच्याकडून घरपोच टोमॅटो कलिंगडचे वाटप



खानापूर(प्रतिनिधी)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी वसंतराव वडगावे यांनी आपल्या शेतातील कलिंगड व टोमॅटोचे गावातील लोकांना मोफत वाटप केले आहे.

येथील दानशूर शेतकरी  वसंतराव वडगावे यांनी सध्या कोरोनाच्या भीषण परस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक लोकांची रोजगार नसल्याने उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत  या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला थोडासा हातभार म्हणून वसंतराव वडगावे यांनी आपल्या शेतातील कलिंगड व टोमॅटो चे गावतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन सोशल डिस्टन्स चे पालन करीत आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वाटप केले.यामध्ये अनेक मोठे उद्योगपती ,मोठ्या संस्था या लॉककडाऊनच्या काळात गोर गरीबांची उपासमार होऊ नये म्हणून मदत करीत आहेत.त्या धर्तीवर एक शेतकरी म्हणून आर्थिक स्वरूपात मदत करू शकत नसलो तरी शेतीमध्ये पिकलेला माल गरिबाला वाटण्यात समाधान  असल्याचे त्यांनी सांगितले.व यापुढे ही आपल्या शेतातील उपलब्ध होणाऱ्या शेवग्याच्या शेंगाचे, टोमॅटो व कलिंगडाचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच गावातील गरजूंना लॉक डाऊन काळात  अत्यावश्यक वस्तूची  मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच गरजूना कोणती अडचण आली अथवा वैद्यकीय मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

         
वडगावे यांनी दोन एकरावर कलिंगडाची ,चार एकरावर टोमॅटोची तर तीन एकरावर शेवग्याची लागवड केली आहे.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून तिन्हीही बागेचे चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.बागेचे चांगले संगोपन केल्यासारखे फळ ही चांगले लागले होते.त्याचे चांगले उत्पादनही मिळणार परंतु संचारबंदीमुळे टोमॅटो ,कलिंगड आणि  शेवग्यास मागणी ही नाही.आणि बाजापेठा उपलब्ध नाही यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या वाटप प्रसंगी सरपंच उत्तम धुते,उपसरपंच रहीम मुजावर, पोलीस पाटील अमोल हिप्परगे,शालेय शिक्षण समितीचे इब्राहिम पटेल ,विकास सोसायटी संचालक अंबाना ढाले,इसाक मुजावर,जहीर शेख,दिलीप इटकळे, अर्जुन धते,रामकृष्ण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध