Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना मुक्तीसाठी लढा देणाऱ्या सर्वांप्रती महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता : नागरिकांनी यापुढे देखील खबरदारी घ्यावी
कोरोना मुक्तीसाठी लढा देणाऱ्या सर्वांप्रती महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता : नागरिकांनी यापुढे देखील खबरदारी घ्यावी
जळगावकरांना दिलासा देणारी बातमी
जळगाव प्रतिनिधी:जळगाव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने मोठ्याप्रमाणात खबरदारी घेऊन कोरोना मुक्तीसाठी लढा दिला होता. गेल्या पंधरवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत कोणतीही वाढ झाली नाही यामध्ये प्रशासनाच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.
कोरोना मुक्तीसाठी झटणारे डॉक्टर्स, परिचारिका, आशा सेविका, पोलीस, सामाजिक संस्था, मलेरिया, आरोग्य विभाग, साफसफाई अधिकारी, कर्मचारी व शासकीय कर्मचारी या सर्वांचे महापौर भारती सोनवणे यांनी आभार व्यक्त केले आहे.
जळगाव शहरातील कोरोनाच्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. जळगावकरांच्या दृष्टीने ही दिलासा देणारी मोठी बाब आहे. कोरोना मुक्तीसाठी लढा देत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका, आशा सेविका, पोलीस, सामाजिक संस्था, मलेरिया, आरोग्य विभाग, साफसफाई अधिकारी, कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे आजवर इतर कुणीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
नागरिकांनो, नियमांचे पालन करा
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, मास्क वापरणे, कान, नाक, डोळ्याला वारंवार हात न लावणे या बाबींचे नागरिकांनी कसोशीने पालन करावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे. तसेच संबंधित कोरोना रुग्णाचा दुसरा रिपोर्ट पंधरा दिवसांनी पुन्हा निगेटिव्ह यावा यासाठी महापौरांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा