Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जनधन व उज्वला खातेदारांना फैजपुर च्या युनियन बँकेची सेवा घरपोच



फैजपूर प्रतिनिधी येथील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पाचशे रुपये फैजपुर च्या युनियन बँकेत जमा होत असल्याने खातेदारांना घरपोच सेवा देत असून ही योजना आधीपासून सुरू आहे परंतु नुकत्याच कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही योजना जोमाने काम करीत आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लाभ गरीब आणि गरजूंना मिळावा म्हणून ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे 

तसेच उज्वला ग्यास धारकांना त्यांच्या खात्यात 744 रुपये जमा होत असून त्यांनासुद्धा ही सेवा घरपोच दिली जात आहे तसेच जनधन खातेदारांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाचशे रुपये प्रमाणे जमा होत असल्याने त्यांनासुद्धा लॉक डाऊन सुरू असल्यामुळे बँकेत किंवा बँकेच्या आवारात गर्दी होऊ नये म्हणून ही योजना बँके तर्फे जोराने सुरू आहे ही सेवा घरपोच सुरू असल्यामुळे युनियन बँकेचे सर्व कर्मचारी ही सेवा कोरोना च्या पार्श्वभूमीवर हॅन्ड ग्लोज सिने टायझर तसेच माक्स च्या वापर करून फैजपुर च्या युनियन बँकेकडून घरपोच सेवा देत आहे बँकेची ही सेवा खातेदारांना एसटी रिक्षा वगैरे ची सुविधा नसल्यामुळे व्यवस्थापक यांनी घरपोच सेवा सुरू केली 

असल्याचे सांगण्यात आले फैजपूर सह आमोदा विरोदा  अकलूज कासवा दुसखेडा कठोरा आदी गावांमध्ये जोराने सुरू आहे तसेच ही सेवा कोरोना च्या पार्श्वभूमीवर व लॉक डाउन च्या काळात फैजपूर युनियन बँकेचे कर्मचारी काटेकोरपणे पालन करीत असल्याचे चित्र आहे  बँकेचे नियोजन येथील शाखा व्यवस्थापक जे एस टोकरे यांच्यासह  युनियन बँकेचे ( बारट्रोनिक्स ) चे बँक मित्र आसिफ तडवी कयूम तडवी जाकिर पिंजारी हे काम पहात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध