Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
खिर्डी खुर्द प्राथमिक आरोग्य उपकेंन्द्राची इमारत स्लाईनवर. सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्य विभागाचे दुर्लक्ष. नवीन इमारत बांधण्याची मांगणी.
खिर्डी खुर्द प्राथमिक आरोग्य उपकेंन्द्राची इमारत स्लाईनवर. सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्य विभागाचे दुर्लक्ष. नवीन इमारत बांधण्याची मांगणी.
खिर्डी प्रतिनिधी रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या खिर्डी खुर्द प्राथमिक उपकेंन्द्राची इमारत शेवटचे श्वास घेत आहे.मात्र हे आरोग्य उपकेंद्र बांधून आज जवळपास २५-३० वर्षे पूर्ण झाले आहेत.ही इमारत लोडबेरिंग ची असल्यामुळे या इमारतीच्या भिंती तसेच छत जीर्ण झाले आहे.
खिर्डी खुर्द गावाची लोकसंख्या जवळपास साडेचार ते पाच हजार असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासकरून महिलांना या जीर्ण इमारत चा मोठा धोका निर्माण झाला आहे.ही इमारत ची मुद्दत संपलेली असून पावसाळ्याच्या दिवसात याचे छताला गळती लागते म्हणून पावसाळ्याधीच ही इमारत नवीन होणे गरजेचे आहे.सध्या या उपकेंद्रात उपचार करून घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .
डिलिव्हरी वॉर्डाची निंदनीय अवस्था
या प्राथमिक उपकेंद्रात महिलांची प्रसूतीसाठी एकच वॉर्ड असून त्याची सुद्धा निंदनीय अवस्था झाल्याची दिसत आहे.या वॉर्डची इमारत पूर्णपणे जीर्ण असून पावसाळ्यात बेडवर्ती प्लास्टिक झाकून ठेवले जातात तसेच यातील भीतीमध्ये जागोजागी तडे पडलेले आहे. ज्यामुळे महिलांच्या जिवाला मोठ्याप्रमाणात धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे गावात महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे .
पावसाळ्याधी नवीन इमारत बांधण्याची मांगणी जोरात
इमारत लोडबेरिंग ची असल्यामुळे इमारतीला जवळपास २५-३० वर्षेपूर्ण झाले असून या इमारतीच्या भीतीला तडे,तसेच ठिकठिकाणी फरश्याही उखरडलेले आहे तसेच येथील डॉक्टर,आरोग्य सेवक,आशावरकर तसेच गावातील जे महिला येथे तपासणी साठी येतात त्यांना सुद्धा या इमारतीच्या पडून जाण्याची भीती वाटत आहे.त्यामुळे येथील येणारे सर्वांनाच या जीर्ण इमारतीचा धोका आहे.म्हणून पावसाळ्याधीच इथं नवीन इमारत बांधण्याची अत्यंत गरज आहे.
प्रतिक्रिया
"इमारत पूर्णपणे जीर्ण असून या उपकेंन्द्रात कोणतेही लसीकरण किंवा इतर कार्यक्रम घेण्यास येथे जागा कमी असल्याने फार अडचणी निर्माण होते.तसेच येथे लहान बाळाला लस गर्भवती महिलांची चाचणी तसेच प्रसूती होते त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारतीची अत्यंत गरज असून शासनाने पावसाळ्याधी नवीन इमारत उपलबध करून द्यावी"
( डॉ चंदन पाटील आरोग्यसेवक उपकेंद्र खिर्डी खुर्द)
"जीर्ण इमारतीमुळे येथील प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांना, लहान बालकांना तसेच डॉक्टर,आरोग्य सेवक,आशावरकर,यांच्या जीवाला धोका असून शासनाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर नवीन इमारत या ठिकाणी उभारण्यात यावी."
(साबीर बेग : युवासेना उपतालुका प्रमुख खिर्डी)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा