Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
दोन दिवसात सुटणार अक्कलपाडा धरणातुन पांझरा नदीत आवर्तन धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश आमदार अनिल पाटील यांनी केली दोन आवर्तनांची मागणी व आग्रह
दोन दिवसात सुटणार अक्कलपाडा धरणातुन पांझरा नदीत आवर्तन धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश आमदार अनिल पाटील यांनी केली दोन आवर्तनांची मागणी व आग्रह
प्रतिनिधी अमळनेर दोन दिवसात पांझरा नदीचे आवर्तन सोडण्याचे आदेश धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. मात्र आमदार अनिल पाटील यांनी दुसऱ्या आवर्तनाची आवर्तनाची देखील मागणी केली व आग्रह धरला
बुधवारी आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी मागील जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती त्याच दिवशी त्या जिल्हाधिकारी यांची रात्री बदली झाली त्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी पुन्हा जळगाव जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांचकडे ही बाब मांडली. त्यानंतर गुरुवारी धुळे येथे जाऊन त्यांना पुन्हा निवेदन देत संजय यादव यांच्याकडे मागणी केली त्यावेळी संजय यादव यांनी पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
अमळनेर तालुक्यातील मांडळ ते नीम कपिलेश्वर मंदिर या नदीसंगमापर्यंत काठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवर आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली कि पाणी योजनांना घरघर लागते. मग टंचाई सुरु होते. त्यामुळे आवर्तन सोडले कि पाणी टंचाई वरील अनाठायी खर्च कमी होतो. हे लक्षात घेता कोरोना पार्श्वभूमीवर यंदा पाणीटंचाईची झळ पोहचू नये यासाठी ही मागणी केली.
या गावांना होणार फायदा – अमळनेर तालुक्यातील मांडळ वावडे, जवखेडा, मुडी, बोदर्डे, लोणसीम, लोणाचारम, लोण बु, लोण खु, भरवस, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली, शहापूर, तांदळी, तर धुळे जिल्ह्यातील न्याहळोद, कौठळ, कंचनपूर, तामसवाडी, वालखेडा, अजंदे, बेटावद, पढावद आदि गावांना याचा गावाचा लाभ होणार आहे.
मूडी फड बंधाऱ्यासाठी 20 लाख रुपये -
धुळे जिल्हा नियोजन समितीकडून पांझरा नदीवरील फड पद्धतीच्या दुरुस्ती साठी 20 लाख रुपये तरतूद करावी अशी मागणीही आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असता जिल्हा नियोजन समितीकडून या फड बंधाऱ्याच्या मांडळ गावाजवळील बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याकरिता उपलब्ध करण्यात येतील अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली यामुळे फड पद्धतीचा पांझरा नदीत आलेल्या महापुरात वाहून गेलेला बंधारा दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे पांझरा नदीत पुराचे पाणी मूडी बंधारा व लौकी नाल्यात प्रवाहित करण्यात येईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा