Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
धडगाव शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न!
धडगाव प्रतिनिधी देशातील कोरोना महामारी संकट व महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे त्यांना प्रतिसाद म्हणून व नंदुरबार जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत धडगाव शहरात ग्रामीण रुग्णालय धडगाव,शहरातील विविध सामाजिक संघटना व स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने एस.व्हि.ठकार माध्यमिक विद्यालयाच्या हॉल मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिरात सोशल डिस्टन्सीचे पालन करत कोरोना संदर्भातील खबरदारी घेत शिबिरात रक्तदान करणाऱ्यांस आलेल्या रक्तदात्यांना सिनेट्रायझरने हात स्वच्छ करून हॉल मध्ये प्रवेश देण्यात आला व नाश्त्यासाठी चहा बिस्कीटची सोय करण्यात आली.रक्तदान शिबिरास तालुक्यातून बराच उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व तालुक्यातील तब्बल 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले
या वेळी अक्रणी तालुक्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, नगराध्यक्षा सुरेखा मोरे,जिल्हा जनसंपर्क अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण,रक्त संक्रमण अधिकारी डॉ.एस.सांगळे,वैद्यकीय अधिक्षक संतोष परमार,खाजगी वैद्यकीय व्यवसाय असो-चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाडवी,वैद्यकीय प्रयोगशाळा अधिकारी अविनाश खैरनार,रक्तपेढी तंत्रज्ञ,शेखर पाटील,मधुसूदन वाघमारे,लक्ष्मण धनगर इ.सह धडगाव ग्रामिण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा