Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

कोरोना एक बिकट संकट...



कोरोना  कोविड  19 हा विषाणु नुकताच शोधला गेला  चीन मध्ये या विषाणु ची लागणं झाली आजार आला  नंन्तर शोध लागला. लागणं कशी झाली या बाबत  सध्या अनेक तर्क आणि कथा लोकं आपले  अंदाज आणि बुद्धी वापरत आहेत. खरं काय हे कालांतराने समजेलच.पुढे येईलच सर्व .. पण तेथून सुरवात तर शेवट कधी कुठं  हे सांगणं कठीण झालंय आता... दिवसेंदिवस रुद्र रूप धारण करतोय जागतिक संकट महामारी रूप घेतलंय कोरोना रोगानं. जवळजवळ सर्व देशात शिरकाव केलाय सतत रोगी वाढतं आहेत आणि मृत्यू आकडा पण वाढतोय. मानव साठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीय समस्या कशी संम्पवायची अजुन पर्यन्त औषध सुद्धा मिळुन आलं नाही  रोग निष्पन्न होऊन 3ते 4महिने झालीत. रोग नियंत्रण म्हणुन खबरदारी उपाय सर्वानी अंगिकारला स्वता ला घरात बंद करणं लॉक डाऊन. हे एकमेव हत्यार आज तरी बचावा साठी साधन. बरीच देश हाच उपाय अवलंबत आहेत. या शिवाय पर्याय उरला नाही. यात आजच हातावर पोट भरणाऱ्यांचं पोट उपाशी मरतंय. अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्यात. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार सुद्धा मद्त घोषणा मोठया झाल्यात लवकर अमलात येवोत. मला वाटतं लॉकडाऊन करण्या अगोदर सरकार नं जनतेला पूर्व कल्पना दयायला पाहिजे होती लॉकडाऊन होणार लोकांनी सुरक्षित स्थान गाठावं.असं झालं नाही. आहे तेथे थांबा असं सांगितलं. काम गेलं तर आहे तेथे खायला कोण देणार अशी समस्या गरीब वर आली तो आपलं गाठोडं परिवार घेऊन पाई मिळेल ते साधन घेऊन घरी निघु लागला संचारबंदी असतांना. सुरक्षित आपलं गांव गाठण्या साठी धडपड सुरु असतांना पोलीस पकडून घेऊ लागले आज महाराष्ट्रात 2ते  3 लाख वर लोकं जागोजागी थांबवले गेले असं मला वाटतं. अगोदरच गावी गेले असते तर तेथे सरकारी यंत्रणा सर्व पुरवणार होतीच. आता यांना रोज अन्नपाणी वेवस्था करण्यात शासकीय सामाजिक संस्था पोसू लागल्या रोज यांच्या साठी अन्नपाणी पुरवणं सरकारचे काम पण सरकारी यंत्रणा यात अडकवून ठेवणं असं झालं. इकडे घरात बसलेल्या लोकांना सांभाळणं रस्त्यावरचे मूर्ख महाभाग पाहणं औषध फवारणी साफसफाई आणि आजारी लोकं शोधुन त्यांना वेवस्थित देखभाल करणं सांभाळणं सर्व आघाडया वर सारी तारे वरची कसरत सुरु झाली यंत्रणेची. . या महामारीत कंबरडं मोडणार अजुन गरीब कष्टकरी शेतकरी यांचं जास्त नुकसान होणार असं दिसतं पण ते सोशिक सोसण्याची ताकत ऊर्जा त्यांच्यात सर्वात जास्त आहे आणि दिसते.. तद नंन्तर मध्यमवर्ग गांगरून जाईल. त्यास जी जीभ आणि भौतिक सुख लागणं झाली त्यावर थोडं  पाणी सोडावं लागेल श्रीमंत थोडा अडचणीत येईल वेवसाय मंदी येईल त्यास फरक पडेल पण फार पडणार नाही असं वाटतं.. आज भारतात जर आजारानं पाय पसरले तर खेड्यातील लोकं जास्त प्रमाणात मरतील किंवा तीच जास्त वाचतील त्यांच्या कडे पहायला कोणाला वेळ असेल शहरातील दवाखाने फुल्ल असतील. या नंन्तर शहरातील अरुंद गल्ली यांना जास्त प्रमाणात झळ पोहचेल. श्रीमंत आपल्या मोठया घरात सुरक्षित आहे. भारतात उपलब्ध साधनसामुग्री कमी सरकारनं हिच वेळ आहे सरकारी दवाखाना सर्व विसरून अगोदर त्यांना अध्यावत  करणं. या क्षेत्रातील खाजगीकरण कमी करून सर्व जनतेला मोफत आरोग्य सुविधा पुरवणं शासकीय मेडिकल  कॉलेज प्रत्येक जिल्यात सुरु करणं नंन्तर तालुक्यातील गावा गावात डॉक्टर पुरवणं प्रत्येक गावात डॉ.  असणं त्यांच राहणं गांव पातळी पर्यन्त सरकारी डॉक्टर पाहिजेत. तसं केलं पाहिजे.. गांव आहे नर्स पाठवा गावातील लोकांना पण किंमत दयायला हवी..अंगणवाडी सेविका पाठवा त्यांना माहिती घ्यायला सांगा म्हणजे नर्स आणि सेविका काय सेवा देणार प्रथमउपचार सांगणार पण जास्त प्रमाणात आजारी असेल तर त्यास हलवणं आणि योग्य ठिकाणी पोहचवणं आलंच त्यात वेळ जाऊन ग्रामीण जनतेची प्राणहानी फार होऊ शकते. आलेलं संकट टाळण्यासाठी प्रबोधन करणं आणि प्राधान्य कर्माने लवकर सारी डॉक्टर सेवा अध्यावत  करणं याला प्राधान्य देऊन भविष्यकाळ साठी पण उपयोगी पडेल असं चिरकाल साठी तरतूद करून ठेवायला पाहिजे. तितकं सोपं नाही पण ईतर गोष्टी कमी करून आरोग्य वेवस्था बळकट लवकर उपचार सरकारी दवाखाना सक्षम करून त्यावर विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे.. समस्या खुप  निर्माण होतील कोरोना या संकटाने पण त्यातुन बोध घेऊन पुढील वाटचाल सुकर होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं. माझ्या मनास  वाटलं लिहलं. खुप आहे लिहण्यास पण थांबतो. आणि साऱ्या मानव जातीस आरोग्य सुख शांती साठी सुष्म स्वरूप देवासमोर प्रार्थना करतो. लेख पुष्प लिहण्यास थांबतो... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055©®

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध