Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

शिरपूर शहरातील प्रत्येक वॉर्ड व प्रभाग होणार अतीदक्ष….. शहरासाठी पोलीस निरीक्षकांनी घेतला “हा” निर्णय…



शिरपूर प्रतिनिधी शहर पोलीस स्टेशन परीसरात आज पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शिरपूर तालुक्यातील नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली होती.येणाऱ्या दिवसात कोरोनावर मात करण्यासाठी “सोशल डिस्टनींग” ठेवत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत शिरपूर शहरात कोरोना विरूध्द लढा लढण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर नगरसेवक व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यात चर्चा करण्यात आली.
यावेळी असे ठरवण्यात आले की,शहरातील प्रत्येक वॉर्ड व प्रभागात नगरसेवक यांच्यासह दहा स्वयंसेवक व एक पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत.

यांच्या सोबतच पोलीसांनी ठरवुन दिलेल्या प्रत्येक वॉर्डातील व प्रभागातील २१ ते ३५ वयोगटातील स्वयंसेवक
नगरसेवक यांच्यासह पोलीस स्वताच्या परिसरात दिवसभर गस्त घालतील,कोणीही विनाकारण घराबाहेर फिरू नये यासाठी या उपाययोजना करण्यात आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध