Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

गरजूंसाठी नगरसेवक शेख कुर्बान यांचा पुढाकार



फैजपूर प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे उद्योग - व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे कामगार, मजूरवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक गोरगरीब कामगारांच्या खानावळी बंद असल्यामुळे त्यांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत, 

हे लक्षात घेत नगरसेवक शेख कुर्बान व त्यांच्या सहकारी मित्रांच्या पुढाकाराने शहरातील सावदा रोड जवळील महाराष्ट्र तोलकाटा येथे सुमारे ५० हून अधिक गरजूंना रोज दोन वेळचे जेवण व नाश्ता वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम संचारबंदी पासून सुरू असल्याचे नगरसेवक शेख कुर्बान यांनी सांगितले.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे कामगार मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एक वर्षांपूर्वी आले. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे काम बंद झाले. त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली. त्यातच संचारबंदीमुळे एसटी बस बंद झाल्यामुळे त्यांचा घरी जाण्याचा मार्गही खुंटला. मात्र, महाराष्ट्र तोलकाटा ग्रुपच्या पुढाकाने त्यांना दोन वेळचे जेवण व नाश्ता देण्यात येत आहे. सर्व ट्रान्सपोर्टच्या मदतीने त्यांना घरी पोहोचले जात आहे. आता पर्यंत ५०० ते ६०० मजुरांना मिळेल त्या वाहनाने त्यांच्या घरी पाठवण्यात येत असल्याचे काम सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध