Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
खरबूज, टरबूजाचा उत्पादन खर्च निघेना, शेतकरी आर्थिक अडचणीत
परतूर प्रतिनिधी:तालुक्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेले टरबूज खरबूजाचा लागवडीसाठी केलेला खर्च विक्री उत्पनातून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. लागवडीवर आणि मिळत असलेल्या उत्पन्नाचा खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याने यावर्षी टरबूज आणि खरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.
यावेळी बोलताना परतूर येथील शेतकरी मुन्ना झंवर बोलताना म्हटले कि सिंगोना शिवारात यावर्षी उन्हाळी पिक म्हणून दोन एकरमध्ये खरबूज आणि टरबूज लागवड केलेली आहे. कोरोना संसर्ग मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांना हा माल बाजारात विकता येत नाही. सध्या उन कडक असल्याने उन्हाने फळ खराब होत आहे. यात बाजारपेठ बंद असल्याने बेभाव विक्री करावी लागत आहे. दोन एकरमध्ये चाळीस हजार रुपये खर्च झाला आहे. बाजारात टरबूज खरबूज हातावर विक्री सूर केली आहे. मात्र चाळीस हजार रुपये झालेला खर्च निघणे कठीण झाला आहे. यामध्ये घाटा येतो का याची चिंता सतावत असून. किमान झालेला खर्च तरी निघाला तरी केलेली मेहनतीवर पाणी फिरणार आहे. अश्या फळ उत्पादन शेतकऱ्यांना शासनाने अनुदान देण्याची मागणी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा